28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईनवीन आर्थिक वर्षात होणार 'हे' महत्त्वाचे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

नवीन आर्थिक वर्षात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल; जाणून घ्या एका क्लिकवर

चालू आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना असून, १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष (New financial year) सुरू होत आहे. आर्थिक वर्ष बदलल्यावर अनेक महत्त्वपूर्ण बदलांना सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या बदलांमध्ये आधारशी पॅनची संलग्नता, इंधन दरातील बदल या बाबी महत्वाच्या आहेत. पुढील महिन्यातील बँकांच्या सुट्यांमुळेही आर्थिक गोष्टींचे बारकाईने नियोजन करावे लागणार आहे.

■ बँकांना १५ दिवस सुट्ट्या
रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे. यानुसार, पुढील महिन्यात १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. साप्ताहिक सुट्ट्या वगळता विविध राज्यांतील वेगवेगळ्या सणांच्या सुट्टया असल्याने १५ दिवस बँकांना सुट्ट्या असतील.

Bank Holiday List 2021 Check Here Full List Of Bank Holidays On Diwali | Bank Holidays 2021: दिवाली पर लगातार 5 दिन इन सभी शहरों में बंद रहेंगे बैंक, चेक करें किस दिन खुलेंगे Bank

■ आधारशी पॅन संलग्नता
पॅन आधारशी संलग्न करणे बंधनकारक आहे. यासाठी ३१ मार्चची अंतिम मुदत आहे. या मुदतीत आधारशी पॅन संलग्न केले गेले नसल्यास ते निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे समभाग व्यवहारसह अनेक महत्त्वाचे व्यवहार पुढील महिन्यात अडकू शकतात.

पॅन-आधार संलग्न नसल्यास शेअर व्यवहारही अशक्य | Even share market transactions are impossible without PAN Aadhaar attached | Loksatta

■ सोने विक्रीच्या नियमांत बदल
ग्राहक मंत्रालयाने पुढील महिन्यापासून सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीत मोठा बदल केला आहे. यानुसार ३१ मार्चनंतर दागिन्यांवरील चार अंकी ‘हॉलमार्क क्रमांक ३१ मार्चनंतर बंद होणार आहे. १ एप्रिलपासून सहा अंकी ‘हॉलमार्क’ प्रमाणित दागिन्यांची विक्री बंधनकारक असणार आहे.

सोने खरेदी करताना सावधान, जाणून घ्या काय झाला नियमात बदल - Be careful while buying gold, know what has changed in the rules | TV9 Marathi

■ करप्रणालीच्या निवडीसह कर नियोजनाची आखणी
नवीन करप्रणालीनुसार वार्षिक ७.५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर २०२३ २४ आर्थिक वर्षांपासून लागू होईल. करदात्यांनी आपल्या उत्पन्नाची चाचपणी करून, नवी अथवा जुनी यापैकी कोणती प्रणाली निवडायची याचा निर्णय घेऊन, कर नियोजन आखावे.

Financial Planning : आर्थिक नियोजनाची ही 7 सूत्रं तुमचं भविष्य सुखकर करतील - BBC News मराठी
■ इंधन दरातील बदल
सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरातील बदल जाहीर करतात. मार्च महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपये वाढ करण्यात आली होती. याचवेळी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात ३५० रुपये वाढ करण्यात आली होती. आता पुढील महिन्यात त्यात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

Petrol Prices Announced Today; Hits Rs 120.51 in Mumbai; Know Petrol, Diesel Rates

हे सुद्धा वाचा : 

Budget 2023: अर्थमंत्र्यांच्या भाषणात असतील हे काही खास आर्थिक शब्द, त्यांचा अर्थ जाणून घ्या म्हणजे तुम्हालाही सहज समजेल अर्थसंकल्प

नव्या वर्षात देखील जगावर आर्थिक मंदीचे सावट ; IMF प्रमुखांचा इशारा

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी