31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमुंबईPolitics : अरेरे!! ठाकरे सरकारची एका महिलेकडून दुर्दशा! देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप

Politics : अरेरे!! ठाकरे सरकारची एका महिलेकडून दुर्दशा! देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप

टीम लय भारी

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतचा कल राजकीय नाही. हे प्रकरण राज्य सरकारनेच (Politics) वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. सरकारमधील काही नेत्यांनी तिची तशी प्रतिमा तयार केली. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? आज एक महिला पूर्ण ठाकरे सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची? दुर्दशा झाली. (Plight of Thackeray government by a woman) राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा समाचार (Devendra Fadnavis took over the state government and Chief Minister Uddhav Thackeray) घेतला आहे.

असे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाले नाही

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडताना सरकारच्या कार्यपध्दतीवर आणि फडणवीसांवर होणा-या आरोपांवर सडेतोड मते व्यक्त केली. ठाकरे सरकारकडून सुडाच्या भावनेने कारवाई केली जाते. यापूर्वी असे झाले नाही. या सरकारला वाटते की, मीडिया असो की, व्यक्ती अथवा राजकीय नेता कोणीही विरोधात बोलू नये, अन्यथा बीएमसीचे लोक त्याच्या घरी जातील. असे राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाले नाही. हे सरकार लोकशाहीवादी नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार सुडाच्या भावनेने काम करीत आहे. त्यांनी राजाची मानसिकता सोडायला हवी, असे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे सरकार एक दिवस स्वत:हून कोसळेल. हे सरकार पाडण्याची कोणतीच आवश्यकता नाही.

सरकारच्या चुका आणि बेजबाबदारपणा समोर आणणे विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी

विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी आहे की, सरकारच्या चुका आणि बेजबाबदारपणा समोर आणणे. कोरोनाच्या काळात मी काहीही आरोप केला नाही. सहकार्याच्या सूचना केल्या आहेत. आमच्या मनात ही बाब पक्की आहे की, आम्हाला हे सरकार पाडायचे नाही. राजकीय इतिहास पाहिला तर दिसून येईल की, अशी सरकारे चालत नाहीत. आपण सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच फायदा होईल. मी तर असेही म्हटले आहे की, आपण सरकार चालवून दाखवा.

राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना काही अर्थ नाही

बिहार निवडणुकीसाठी भाजपने प्रभारी म्हणून नियुक्त केले असले तरी राष्ट्रीय राजकारणात जाण्याच्या चर्चांना काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्यासाठी करण्यासारखे आणखी बरेच काही आहे. भाजपमध्ये जुन्या चेह-यांना बाजूला केले गेल्याचे बोलले जाते. मात्र, याचाही त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. यापूर्वी अरुण जेटली आणि अनंत कुमार यांच्यासारखे नेते ही जबाबदारी सांभाळत होते. दोन-तीन वर्षांत आम्ही असे अनेक नेते गमावले. पक्ष आता नवी टीम तयार करीत आहे. त्यादृष्टीनेच पक्षाने माझी निवड केली आहे. मी विरोधी पक्षनेता तर आहेच. त्यामुळे महाराष्ट्र सोडून जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे फडणवीस म्हणाले.

खडसेंचे आरोप बिनबुडाचे

मी एकनाथ खडसे यांच्या आरोपांना उत्तर देत नाही. कारण, ते जे काही बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही. जर त्यांच्या आरोपानंतर लोकांच्या मनात माझ्याबद्दल काही मत तयार झाले तर मला उत्तर द्यायला हवे. सर्वांना माहीत आहे की, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. मग मी का उत्तर देऊ?

राज्य सरकार कोरोना रुग्ण, मृतांची संख्या लपवत राहिले

कोविड-१९ ची साथ सुरू झाल्यापासूनच महाराष्ट्र सरकार संसर्गित रुग्ण आणि मृतांची संख्या लपवत राहिल्याने स्थिती अतिशय गंभीर बनली, असा आरोप माजी फडणवीस यांनी केला. कोरोनाविरुद्ध लढण्याऐवजी सरकार कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या कमी कशी दाखविता येईल, याच खटाटोपात होते. त्यामुळेच चाचण्या (टेस्टिंग) कमी करण्यात आल्या. बिहारमध्ये दररोज दीड लाखाहून अधिक लोकांच्या चाचण्या केल्या जात आहेत, तर महाराष्ट्रात जवळपास ९० हजार चाचण्या होत आहेत. मागच्या २० दिवसांत महाराष्ट्रात संसर्गाचा दर २५ टक्क्यांहून जास्त आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्याची व इस्पितळात खाटा वाढविण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू

देशाच्या तुलनेत कोरोनामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू होत आहेत, हे दुर्दैव आहे. निश्चितच नियोजनात चूक झाली आहे. भीतीपोटी चाचण्या कमी करू नका. आवश्यक सुविधा वाढवून त्वरेने व्यवस्था केली तरच समस्यांवर मात करण्याची आशा बाळगू शकतो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी