राष्ट्रीय

शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले

गावांची, जागांची, शहरांची नावे बदलण्याचे राजकारण सावरकरांनी 63 वर्षांपूर्वीच सुरू केले आहे. हे काही आजचे राजकारण नाही. केंद्रातील मोदी-भाजप सरकारने दिल्लीतील राष्ट्रपती भवनात असलेल्या मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान केले. मोदी, भाजपच्या अमृत काळातच नामांतर राजकारणाला ऊत आलेला आहे. या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांनी 1960 मध्ये अहमदाबाद शहराचे नामकरण कर्णावती व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. अर्थात, देशातील इतर शहरांची नावे बदलणाऱ्या भाजपने आणि गुजरातेतील मोदी-शाह यांना अजूनही परकीय, आक्रमक मुस्लीम राजाचेच नाव या शहारासाठी कायम ठेवलेले आहे.

अहमदाबाद Vs कर्णावती हा वाद सावरकर यांनी 63 वर्षांपूर्वी जन्माला घातला आहे. अहमदाबाद शहराचे नाव बदलून ते कर्णावती करण्याची मागणी आता गुजरातमधूनच जोर धरत आहे. हिंदुत्त्ववादी विद्यार्थी संघटनाच त्यासाठी आग्रही आहेत. हिंदू राष्ट्रवादी म्हटल्या जाणाऱ्या व कट्टर उजव्या विचारधारेच्या सावरकरांनी अहमदाबाद शहराच्या नामांतरासाठी सर्वप्रथम 1960 मध्ये आवाज उठवला होता. त्यांना अहमदाबाद शहरावरील परकीय मुस्लीम आक्रमकाचे नाव पुसायला हवे होते. त्यासाठीच अहमदाबादचे नाव बदलून सावरकरांना ते कर्णावती ठेवावे, असे वाटत होते. दुर्दैवाने, इतके वर्षे गुजरातमध्ये सत्तेत राहून आणि 2014 पासून केंद्रात निरंकुश सत्तेत राहूनही डबल इंजिन भाजप सरकारने सावरकरांची इच्छा पूर्ण केलेली नाही. अहमदाबादचे नाव कर्णावती व्हावे, ही सावरकरांची इच्छा तब्बल 62 वर्षे उलटूनही अजून पूर्ण झाली नाही.

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मुस्लिम आक्रमकांनी भारतीयांवर लादलेली परकीय संस्कृती, पुसून काढावी अशी सावरकरांची इच्छा होती. देश स्वतंत्र झाल्याने परकीय शासकांची, गुलामगिरीची प्रतीके आता नाहीशी झाली पाहिजेत, असे सावरकरांना 60 वर्षांपूर्वीच वाटत होते. चिरायू पंडित आणि उदय माहूरकर यांनी सावरकरांवर लिहिलेल्या ‘फाळणी रोखू शकणारा माणूस’ या पुस्तकात नामांतर राजकारणाचा विस्तृत उल्लेख आहे. परकीय गुलामगिरीची प्रतीके आणि आशा सर्व ठिकाणांच्या नामकरण करण्याबाबत सावरकरांची स्वतःची एक वेगळीच दृष्टी होती, असे दिसून येते.

 

महाराष्ट्राचे दोन तुकडे करून मोरारजी देसाई आदी नेत्यांनी महाराष्ट्रापासून गुजरात हे राज्य वेगळे केले. सावरकरांना तत्पूर्वीच अहमदाबाद नाव मिटवून टाकावे, असे वाटत होते. अहमदाबाद शहराचे नाव बदलून ते कर्णावती ठेवावे, असे सावरकर यांनी 4 फेब्रुवारी 1960 रोजी सुचवले होते. देश गुजरात या वेबसाइटने सावरकरांच्या अहमदाबाद नामांतर मागणीविषयी लेखातून यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

 

पंडित आणि माहूरकर यांच्या सावरकरांवरील पुस्तकात लिहिले आहे, की अहमदाबाद शहराचे खरे नाव कर्णावती होते. मात्र, सुलतान अहमद शाह याने ते बदलून अहमदाबाद असे केले. याच अहमद शाहने अहमदशाही घराण्याची पुढे स्थापना केली. कट्टरतावादी इस्लामिक राज्यकर्त्यांनी मध्ययुगीन काळात इस्लामिक संस्कृती हिंदूंवर लादण्यासाठी भारतीय शहरे, प्रतीके, प्रदेश यांची नावे बदलून इस्लामिक पद्धतीने ठेवली होती. सावरकरांना परकीय निशाणी असलेलया भारतीय शहरांची नावे बदलावी असे वाटत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या विजयाचा सूर्य उगवताच सावरकरांना मुस्लिम नावे बदलून हवी होती. अहमदाबाद हे अपमानास्पद आणि द्वेषपूर्ण नाव गुजरातच्या नकाशावरून हटवणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे ते मानत. नव्या गुजरातची राजधानी म्हणून हे शहर कायम ठेवायचे असेल, तर त्याचे नाव ‘कर्णावती’ असे बदलून ठेवले पाहिजे, असा विचार सावरकरांनी मांडला होता.

 

हे सुद्धा वाचा : 

Udyanraje Bhosale: रयत शिक्षण संस्थेचे नामांतर पवार शिक्षण संस्था करा; खासदार उदयनराजेंची जळजळीत टीका

session : अखेर आजच्या अधिवेशनात नामांतराला संमती मिळाली

सावरकर गौरव यात्रेत मग्न शिंदे-फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले

सावरकरांनी इतरही अनेक ठिकाणांची नवी नावे सुचविली होती. अरबी समुद्र हे नाव बदलून रत्नाकर ठेवावे, अशी सावरकरांची भूमिका होती. द्वारका ही श्रीकृष्णाची राजधानी गुजरातच्या किनारपट्टीवर वसलेली आहे. त्याचा पुराणात उल्लेख आहे. सागराचे (सध्याचा अरबी समुद्र) वर्णन ‘रत्नाकर’ असे पुराणात केलेले आहे. तिथे रत्नाकर नसेल तर मग अरबी समुद्राला ‘सिंधू सागर’ नाव द्यावे, अशी सावरकरांची मागणी होती. कारण सिंधू नदी या सागरात विलीन होते. बंगालच्या उपसागराचे नावही बदलून ‘गंगासागर’ ठेवले जावे, अशी सावरकरांची इच्छा होती. गंगा नदी इथल्या समुद्रात विलीन होते. गुजरातची नवी राजधानी गांधी नगरचे नाव बदलून सरदार पटेल यांच्या नावावरून ‘वल्लभ नगर’ ठेवावे, अशीही सावरकरांची मागणी होती.

Namantar Savarkar started the politics of religion Name Change, gandhi nagar vallabh nagar , arabian sea sindhu sagar

 

विक्रांत पाटील

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago