32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeव्हिडीओसावरकर गौरव यात्रेत मग्न शिंदे-फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले

सावरकर गौरव यात्रेत मग्न शिंदे-फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले

सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ? सावरकरांनी सहा सोनेरी पाने आणि हिंदुपद पातशाही या पुस्तकातून शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची काय बदनामी केली, ते या व्हीडिओतून मांडले आहे. याशिवाय, शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या, राजकारण करणाऱ्या मंडळींच्या दांभिक आणि दुटप्पी धोरण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

सावरकर गौरव यात्रेत मग्न शिंदे-फडणवीस सरकार छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले. शिवराय पुण्यतिथीला कोणताही  सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात नाही. मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांना शिवरायांना श्रद्धांजली अर्पण करायलाही वेळ मिळाला नाही. ते फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून मोकळे झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर सोशल मीडियावर शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासही वेळ मिळाला नाही. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे हिंदवी स्वराजचे संस्थापक, स्वराज्यरक्षकांच्या पुण्यतिथीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. शिवरायांना अभिवादन करायला, या राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीस श्रद्धा-सुमने अर्पण करायला एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस अँड कंपनीला वेळ मिळाला नाही. कारण ही मंडळी छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या सावरकरांच्या गौरव यात्रेत मश्गुल झालेली होती.


सावरकरांनी शिवरायांची नेमकी काय बदनामी केली ? ☟☟ 

सावरकरांनी सहा सोनेरी पाने आणि हिंदुपद पातशाही या पुस्तकातून शिवरायांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची नेमकी काय बदनामी केली, ते या व्हीडिओतून मांडले आहे. याशिवाय, शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या, राजकारण करणाऱ्या मंडळींच्या दांभिक आणि दुटप्पी धोरण दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदाबाद शहराचे नाव कर्णावती करावे, ही विनायक दामोदर सावरकर यांची इच्छा होती. ती भाजप का पूर्ण करत नाहीये, हाही सवाल आहेच.


 

एकीकडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि भाजपेयी मंडळी शिवरायांची बदनामी करणाऱ्यांच्या यात्रेत मश्गुल असताना दुसरीकडे, अजित पवार, नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे आदींनी विधानभवनातील महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली.

Chhatrapati Shivaji Maharaj,Vikrant Patil, Lay Bhari, Savarkar Gaurav Yatra, Shinde Fadnavis government

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी