राष्ट्रीय

हिराबेन मोदी यांचे निधन; शोकमग्न पंतप्रधानांनी म्हटले, एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे.  (Narendra Modis Maa Hiraben Modi Dies) अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शोकमग्न पंतप्रधानांनी दिल्लीहून अहमदाबादकडे रवाना होण्यापूर्वी ट्विट करून आईंना श्रद्धांजली अर्पण केली. एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

100 वर्षीय हिराबेन यांच्यावर अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे, अशी माहिती गुरुवारीच गुजरात सरकारकडून देण्यात आली होती. त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो, असेही सांगितले गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये जाऊन हिराबेन यांची भेट घेऊन आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई हिराबेन मोदी यांच्या निधनापूर्वी दोन दिवस आधीच आईच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतले होते. (फाईल फोटो, सौजन्य : गुगल)

श्वास घेण्यास त्रास तसेच रक्तदाब असल्याने हिराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या गांधीनगर शहराजवळील रायसन गावात पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ, पंकज मोदी यांच्यासोबत राहत होत्या. पंतप्रधान नियमितपणे रायसनला भेट देत असत. गुजरात निवडणूक दौऱ्यांमधील बहुतेक वेळ मोदींनी आईसोबत घालवला.

पंतप्रधानांनी ट्विटद्वारे आईला श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले – एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले. माँमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती जाणवली; ज्यात मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन जगणाऱ्या निस्वार्थी कर्मयोगी, तपस्वीचा प्रवास होता.

हे सुध्दा वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्बेत खालावली; रुग्णालयात दाखल

हे सरकार गोरगरीबांना हालअपेष्ठांमध्ये सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान

Narendra Modis Maa Hiraben Modi Dies Modi Tweets Glorious Century Rests At The Feet of God

विक्रांत पाटील

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

4 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

6 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

6 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

7 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

8 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

9 hours ago