पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन झाले आहे. (Narendra Modis Maa Hiraben Modi Dies) अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे साडेतीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शोकमग्न पंतप्रधानांनी दिल्लीहून अहमदाबादकडे रवाना होण्यापूर्वी ट्विट करून आईंना श्रद्धांजली अर्पण केली. एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
100 वर्षीय हिराबेन यांच्यावर अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे, अशी माहिती गुरुवारीच गुजरात सरकारकडून देण्यात आली होती. त्यांना एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळू शकतो, असेही सांगितले गेले होते. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच अहमदाबादमध्ये जाऊन हिराबेन यांची भेट घेऊन आईच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

श्वास घेण्यास त्रास तसेच रक्तदाब असल्याने हिराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या गांधीनगर शहराजवळील रायसन गावात पंतप्रधान मोदींचे धाकटे भाऊ, पंकज मोदी यांच्यासोबत राहत होत्या. पंतप्रधान नियमितपणे रायसनला भेट देत असत. गुजरात निवडणूक दौऱ्यांमधील बहुतेक वेळ मोदींनी आईसोबत घालवला.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
पंतप्रधानांनी ट्विटद्वारे आईला श्रद्धांजली अर्पण करताना लिहिले – एक गौरवशाली शतक ईश्वरचरणी विसावले. माँमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती जाणवली; ज्यात मूल्यांसाठी वचनबद्ध जीवन जगणाऱ्या निस्वार्थी कर्मयोगी, तपस्वीचा प्रवास होता.
हे सुध्दा वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्बेत खालावली; रुग्णालयात दाखल
हे सरकार गोरगरीबांना हालअपेष्ठांमध्ये सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही
आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान