30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeसंपादकीयआजच्या समाजातील स्त्रीचे स्थान

आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान

शिल्पा नरवडे

“शिक्षक मी, कलावती मी, विश्वाची मी ममता मज मध्ये संस्कृती वसे संस्कृती जणू संवर्धे स्त्री माझं नाव”

मी लहानपणापासून ऐकत आले एकविसाव्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता होणार, स्त्री सक्षम होणार. २०२१ साल उजाडले पण स्त्रीयांना विषयी पुरुषांचे मानसिक विचार काही बद्दले नाहीत. १८४८ साली पुण्यात, मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चालू करून स्रियांना जी दूरदृष्टी दाखवली त्याला खरंच आज तोड नाही. जाचक धार्मिक बंधने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जात्यात रोज भरडल्या जाणार्‍या लाखो स्त्रियांसाठी ‘शिक्षण’ एक अपूर्व असा आत्मभानाचा प्रकाश घेऊन आले. शिक्षण घेण्यासाठीचा स्त्रियांचा लढा हा कधीच सोपा नव्हता आणि आजही नाही. निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्या तर तिला पार पाडाव्याच लागतात. त्याच बरोबर तिच्यावर लादल्या गेलेल्या ही जबाबदाऱ्या ती पार पाडतचे आहे.

महिलांना शिक्षणामुळे आत्मविश्वास आला. त्या सक्षम झाल्या आहेत, पण त्यांचे सक्षमीकरण पचवू शकणारे पुरुष आपला समाज तयार करू शकलेला नाही. राजकीय पौगंडावस्थेमध्ये स्रिया वाहून जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता प्रचंड धोक्यात आलेली आहे. लहान मुलींवर लैंगिक अत्याचार वाढले आहेत. पुरुषसत्ताक मानसिकतेमूळे प्रेमात नात्यात नकार न पचवू शकणारे पुरुष तसेच एकतर्फी प्रेम करणारे पुरुष ऍसिड खून बलात्कार, चारित्र्यहीन करणारे पुरुष दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुरुषसत्ताक अवस्थेमध्ये आजही तिला तिच्या लैंगिकतेविषयी अबोल राहावे लागत आहे.

आपल्या समाजामध्ये पुरुषांचा स्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मुलगा-मुलगी अजूनही भेदभाव केला जातो. पुरुष हा स्त्रीला त्याच्या हातातले खेळण, कटपुतली,त्याच्या इशाऱ्यावर बोटावर नाचणारी एक बाहुली समजतो.आणि अजूनही आपल्या समाजामध्ये स्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते. त्यामुळे स्रियांकडे बघण्याची मानसिकता आणि स्रियांविषयीचे विचार हा पुरुष कधी बदलुच शकत नाही. समाजातील घरातील पुरुषांची मानसिकता जर स्रियांविषयी बदलायची असेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येणारी मुलगा मुलगी समान मानली पाहिजे. दोघांनाही एकसारखे खेळणे दिले पाहिजे. आपल्याकडे मात्र मुलीला भांडी, बाहुली दिली जाते. आणि मुलांना बॅट बॉल दिला जातो. इथेच एवढा मोठा फरक केला जातो. कारण मुलगी ही घरात राहील पाहिजे, आणि मुलगा घराबाहेर पडले हे विचार जर बद्दले तर आणि त्या दोघांनाही जर लहानपणापासून एकसारखी शिकवण दिली. तर नक्कीच पुरुषाची स्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलेल.ज्या महिला आर्थिक स्वावलंबी आहेत त्या समाजाचे अन्यायकारक नियम झुगारून स्वतः निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे महिलांना पुरुषांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनवलं पाहिजे. तेव्हाच महिला स्वतः सामाजिक बेड्या तोडू शकतील.

महिला सुशिक्षित सक्षम समृद्ध आजही आहेत. उद्याही असतील आणि इथून पुढे ही होतील. पण आपल्या पुरुषी समाजाने हे स्वीकारायला हवे. तिच्यावविषयी आदर बाळगायला हवा. या समाजातील प्रत्येक महिला तसेच रस्त्याने जाणारी प्रत्येक मलगी ही एकटी नसून ती आपली किंवा माझी जबाबदारी आहे. हे स्वीकारले तर नक्कीच स्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटतील आणि आपला समाज माणुसकीच्या प्रवासातील हे क्रांतिकारी मोठं पाऊल ठरेल.

स्त्रियांचे समाजातील स्थान व त्यांची सुरक्षितता आज २१ व्या शतकात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. इ.सन पूर्वच्या काळात स्त्रियांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची होती. राजाराममोहन रॉय व ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या अडचणी समजून त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवला. महात्मा फुले यांनी स्व:ताच्या बायकोला सावित्रीबाई फुले यांना शिकवून पुण्यात मुलींसाठी पहिली मुलींची शाळा काढली यामुळे शिक्षणाचे महत्तव मुलींना कळले आणि त्यामुळे आज २१ व्या शतकातसुध्दा स्त्रिया या पुरूषांच्या बरोबरीने शिकून मोठमोठ्या अधिकारी पदांवर काम करताना दिसत आहेत. राजाराममोहन रॉय यांनी विधवा पुर्नविवाह याला पाठिंबा दिल्यामुळे आजच्या काळात सुध्दा स्त्रियांचे पुर्नविवाह होत आहेत. इ.स पूर्व मध्ये हुंडाबळी ही समस्यासुध्दा होतीच पण आजसुध्दा २१ व्या शतकात स्त्रियांना हुंडाबळी या समस्येला सामोरे जावे लागते. या हुंड्यामुळे कित्येक मुलींचे आणि त्यांच्या आई-बाबांचे आयुष्य उध्वस्त होते. हुंड्यामुळे कित्येक मुलींना शारीरीक,मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम त्या मुलींच्या मानसिक स्वास्थ्यावर तसेच शारीरीक स्वास्थ्यावर होतोच शिवाय त्या मुलींच्या घरच्यांनासुध्दा सहन करावा लागतो. या सर्वामुळे तिच्या घरच्यांनासुध्दा खूप मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो. काही ठिकाणी मुली कितीही शिकल्या तरी त्यांना या सर्व त्रासांमुळे स्वताचा जीव गमावून आयुष्य संपवावे लागते.

स्त्रियांच्या बाबतीत आज २१ व्या शतकात फक्त चूल आणि मूल अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. स्त्रियांनी अनेक छोटे-छाेटे उद्योग घरच्या घरी करून त्यातूनसुध्दा मानाचे स्थान मिळवले आहे. आजच्या २१ व्या शतकात मुली किंवा स्त्रिया या स्वतंत्र विचारांच्या जरी असल्या तरी त्यांनी त्यांची मर्यादा ओळखून वागायला हवे, त्यामुळे विनयभंग, बलात्कार अशा समस्या उद्भवणार नाहीत असे वाटते. स्त्रिया या सर्व कुटूंबाची जबाबदारी स्विकारून नोकरी करतात, त्यावेळी घरच्यांनीसुध्दा पाठिंबा दिल्यामुळे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वताला खंबीरपणे सिध्द करू शकतात. शिक्षणामुळे त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पहायला मिळते. या सर्व गोष्टी जरी ख-या असल्या तरी स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोज सकाळी लवकर उठून घरच्यांसाठी जेवण करून मुलांचे सर्व नीट करून एखादी स्त्रीही जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षित घरी येऊ शकते का? याचा सर्वानी विचार करावा. आजकाल स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात. स्त्री ही मुळातच सहनशील असते म्हणून तिने होणा-या अत्याचारांना सहन करणे हे योग्य नाहीये ना?

आज स्त्रियांवर खूप अत्याचार होताना दिसतात. काही वेळेला तर स्त्रियांना खुप घाणेरडे असे अश्लील विनाेदांना सामोरे जावे लागते,तसेच अतिशय वाईट कमेंन्ट्सना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार करताना आणखी एका महत्तवाच्या समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे मोठ्या मुली किंवा स्त्रियांना जसे बलात्काराचा सामना करावा लागतो तसेच कितीतरी नि:श्पाप जीवांना सुध्दा म्हणजेच २/३ वर्षाच्या मुलींना सुध्दा ह्या बलात्काराचा सामना करावा लागतो. या सर्वामध्ये त्यांची काही चूक नसते तरी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्यावेळी अशा सर्व गोष्टी घडतात तेव्हा असे कृत्य करताना त्या व्यक्तींना कसलीही लाज का वाटत नाही असा प्रश्न निर्माण होतो? या सर्व गोष्टी करताना काही वेळेला नातेवाईक या सर्वाला कारणीभूत असतात. या सर्व गोष्टीमध्ये लोकांची बघ्याची भूमिका असते. कोणीही कसलीही पर्वा करत नाही. या सर्वामुळे स्त्रियांची सुरक्षितता करणे हे सर्वस्वी त्या स्त्रीचे जसे कर्तव्य आहे तसेच इतरांचेही कर्तव्य आहे असे मला वाटते. सर्वानीच स्त्रियांना मानाने, आदराने वागवावे अशी विनंती स्त्रीही अनेक बाबतीत जशी स्वतंत्र विचारांची असते तसेच इतरांनीही तिला समजून घ्यावे आजच्या काळात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात काम करून नाव कमावले आहे याचा सर्वानी आदर करावा.”

“स्त्री सुखाचा सागर स्त्री प्रेमाचे आगर
स्त्री मायेची साखर
स्त्री करुणेचे अंबर
स्त्री स्वर्ग सुखाचे द्वार”
शांत, संयमी, सक्षम, स्त्री परिपूर्णतेचे मूर्तिमंत रूप स्त्री विधात्याची साक्षात प्रतिकृती स्त्री
सुंदर,सक्षम, सुशील, आजची स्त्री
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी