राष्ट्रीय

पोस्ट खात्यात एकाच दिवसात 5000 ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांना मंजूरी; बदल्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

देशभरात गावागावांमध्ये विस्तारीत झालेले भारतीय टपाल खात्याची (Postal Department) ओळख आहे. टपाल खात्यात ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) बदल्यांबाबत टपाल खात्याने मोठे पाऊल उचलले आहे. बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. त्यासाठी ‘ऑनलाइन विनंती बदली पोर्टल’ (Online request Transfer Portal) सुरू केले आहे. या पोर्टलव्दारे आता ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने बदल्यांमध्ये पारदर्शकता राहणार आहे.
टपाल सेवेचे महा संचालक आलोक शर्मा, यांनी 23 टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल आणि विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत बुधवारी (दि. २८) या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. या पोर्टलचा प्रारंभ झाल्यानंतर, एकाच दिवसात 5000 हून अधिक जीडीएसच्या बदल्यांना ऑनलाइन पोर्टलद्वारे मंजुरी देण्यात आली. आलोक शर्मा यांनी माहिती दिली की, ग्रामीण डाक सेवकांकडून अर्ज मागवण्यापासून ते मंजुरी आणि बदली आदेश जारी करण्यापर्यंतची संपूर्ण बदली प्रक्रिया आता या ऑनलाइन विनंती बदली पोर्टलव्दारे पेपरलेस आणि सोपी करण्यात आली आहे.
भारतीय टपाल खात्याची जगभारात एक वेगळी ओळख आहे. गावखेड्यांपर्यंत सेवा देणारे टपाल खाते ब्रिटीश काळापासून आजअखेर आपल्या अनोख्या सेवेमुळे प्रसिद्ध आहे. काळानुरुप अनेक बदल घडत आले, तसे टपाल खात्याने देखील आपल्या सेवेमध्ये काळानुरुप अनेक बदल स्विकारले त्यामुळे टपाल खात्याची देशभरात एक वेगळी ओळख आहे.

हे सुद्धा वाचा

Post Office Investment Scheme : सुरक्षित पैसे अन् मोठा व्याजदर! पोस्टाच्या ‘या’ स्किममुळे तुम्हीही व्हाल लखपती

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांनी तुमचे पैसे होतील दुपट्ट, वाचा सविस्तर

अमेरिकेचा माज निसर्ग उतरवतोय; हिमवादळापुढे सपशेल शरणागती; शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती !

टपाल विभागामध्ये देशभरामध्‍ये 1,56,000 पेक्षा जास्त टपाल कार्यालये आहेत, त्यापैकी 1,31,000 पेक्षा जास्त शाखा ‘पोस्ट ऑफिस’ (BO) ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण डाक सेवकांच्या (GDS) द्वारे टपाल विभागाच्या सुविधा लोकांना पुरविल्या जातात. ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी टपाल खात्याने आधुनिक पद्धतीने ऑनलाईन बदल्यांचे पोर्टल सुरू करुन महत्त्वपूर्ण पाऊल उलचलेल आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ऑनलाइन रिक्वेस्ट ट्रान्सफर पोर्टल लाँच’ सुरू करणे म्हणजे प्रशासन प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे वेळ आणि संसाधनांचीही बचत होणार आहे.

 

प्रदीप माळी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

15 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

16 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

16 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

16 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

19 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

19 hours ago