राष्ट्रीय

ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. “पापा आता या जगात राहिले नाहीत,” असे ट्विट करून मुलगी सुभाषिनी यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शरद यादव हे गुरुवारी रात्री त्यांच्या दिल्लीतील छतरपूर निवासस्थानी चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. त्यांना तातडीने गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना वाचवता आले नाही. यादव दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि ते नियमितपणे ‘डायलिसिस’ करत होते. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटनेही निवेदन जारी करून रात्री 10.19 वाजता शरद यादव यांच्या मृत्यूची माहिती दिली. यादव यांना बेशुद्ध अवस्थेत आपत्कालीन वॉर्डमध्ये आणण्यात आले होते. खूप प्रयत्न करूनही त्यांचा जीव वाचवता आला नाही, आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करू इच्छितो, असे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

शरद यादव यांच्या पार्थिवावर शनिवारी मध्य प्रदेशातील होशंगाबाद या त्यांच्या जन्मस्थानी अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. त्यांचे पार्थिव 13 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या दिल्लीतील छतरपूर फार्म निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. शरद यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी अध्यक्ष लालू यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, अखिलेश यादव यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.

शरद यादव यांच्या पश्चात पत्नी, मुलगी सुभाषिनी आणि मुलगा शंतनु असा परिवार आहे. शरद यादव चार वेळा बिहारच्या मधेपुरा मतदारसंघातून खासदार होते. ते केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. शरद यादव यांनी 1999 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये विविध खाती सांभाळली. 2003 मध्ये शरद यादव जनता दल युनायटेडचे अध्यक्ष बनले. ते 7 वेळा लोकसभेचे आणि 3 वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 2016 मध्ये त्यांनी नितीश कुमार यांच्या जेडीयूशी संबंध तोडून नव्या पक्षाची स्थापना केली. यानंतर त्यांनी हा पक्ष राष्ट्रीय जनता दलात विलीन केला. त्यांची मुलगी सुभाषिनी सध्या काँग्रेसमध्ये आहे.

हे सुध्दा वाचा : 

बिहारमध्ये जदयु – भाजप मध्ये लव्ह जिहाद !

शरद पवार, बस नाम ही काफी है

राहुल गांधी म्हणाले, RSS-BJPवाले माझे गुरु; भारत जोडो यात्रा यशस्वी केल्याबद्दल मानले भाजप, संघाचे आभार !

Samajwadi Leader Sharad Yadav Passes Away, PM Modi Condolences, ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांचे निधन, Prominent Socialist Reformer

 

विक्रांत पाटील

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

2 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

2 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

2 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

2 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

2 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

6 hours ago