33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeटॉप न्यूजबिहारमध्ये जदयु - भाजप मध्ये लव्ह जिहाद !

बिहारमध्ये जदयु – भाजप मध्ये लव्ह जिहाद !

अतुल माने, जेष्ठ पत्रकार

पाटना : पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी नाराज असलेले नितीशकुमार (Nitish Kumar) आणि त्यातच अरुणाचल मध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने  केलेली दगाबाजी, तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाने पुन्हा एकत्र येण्यासाठी घातलेली साद या गोष्टीला पूरक असलेली संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आर सी पी सिंह म्हणजेच रामचंद्र प्रताप सिंह यांची झालेली निवड ही आगामी काही काळातील बिहारच्या राजकारणातील एक भूकंपाची नांदी मानली जात आहे. यातच भाजपचा लव्ह जिहाद चा अजेंडा राबविण्यास जेडीयू कडून स्पष्ट नकार दिला असल्याने त्याचे पडसाद आगामी काही दिवसात पाहावयास मिळणार आहे.

आरसीपी सिंह हे तत्कालीन भारतीय प्रशासकीय सेवेतील बिहार केडर चे अधिकारी आहेत. राज्यसभा सदस्य असलेल्या सिंह यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव मोठा आहे. अल्पमतात असूनही केवळ भाजपच्या मेहेरबाणीने बनलेले हे सरकार असून आपल्याला यामध्ये काहीही मोकळीक नसल्याची भावना जदयु च्या मंत्री आणि कार्यकर्त्यांमध्ये पसरू लागली आहे. नितीशकुमार यांच्या कडे असलेल्या गृह खात्यातही भाजपचा हस्तक्षेप आणि दबाव गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. विशेषतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीत भाजप आमदार आणि बाहुबली नेत्यांकडून नितिषबाबू यांच्यावर सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे गृहखाते असूनही आपल्याला काहीही अधिकार नसल्याची खंत नितीशकुमार यांनी अलीकडेच खासगीत बोलताना व्यक्त करून असले मुख्यमंत्री पद कायम कामाचे असा त्रागाही व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेश प्रमाणे बिहार मध्येही लव्ह जिहाद कायदा लागू करण्यासाठी भाजप आग्रही आहे. पण हा कायदा लागू होऊ नये यासाठी आता जदयू च्या आमदारांनी कंबर कसली आहे. हा कायदा जातीय तेढ निर्माण करणारा असून आमचा त्याला संपूर्ण विरोध असल्याचे जदयू चे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी सांगितले. तर हा कायदा बिहार मध्ये लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हे आग्रही आहेत. हा कायदा देशासाठी धोकादायक असल्याचे मत त्यागी यांनी व्यक्त करताना जाती जाती मध्ये तसेच धर्मात विषवल्ली पसरवणारा हा कायदा केवळ बिहार नव्हे तर देशात कुठेही लागू होऊ नये असे सांगितले. आम्ही कोणत्याही स्थितीत हा कायदा बिहार मध्ये लागू करू देणार नाही त्यासाठी कोणतीही राजकीय तडजोड करणार नाही. दबाव आल्यास प्रसंगी सत्तेचा सुद्धा विचार करू शकतो , असा इशारा त्यागी यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान जदयू च्या नव्या अध्यक्षानी सूत्रे स्वीकारताच भाजपला अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्या प्रमाणे राजधर्म पाळावा असे सांगून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काही काळात भाजप आणि जदयू मधील तणातनी वाढत जाणार हे निश्चित.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी