35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजसरकार विरोधात विरोधकांत एकमत

सरकार विरोधात विरोधकांत एकमत

टीम लय भारी
दिल्ली : भारतात अनेक पक्ष आहेत आणि आतापर्यंत विरोधी पक्षात एकमत दिसून येत नव्हतं. मात्र पेगासस सॉफ्टवेअर वरून सगळे विरोधी पक्ष एकत्र येत आहेत असे समजते. (Opposition parties get together to discuss about Pegasus software)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत एक बैठक भरवली. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोबतच निरनिराळ्या 14 पक्षांचे नेते उपस्थित होते. मुख्य म्हणजे शिवसेना प्रथमच विरोधी पक्षाच्या एकत्रित बैठकीत उपस्थित राहिली होती.

डोंगराला तडे, निवासी बेजार, पोलिसांच्या मदतीने नदी केली पार

Opposition
पेगासस नावाचं हत्यार सरकारने आपल्या मोबाईल मध्ये घुसवले आहे

देवेंद्र फडणवीस, रोहित पवार एकाच तालुक्याच्या दौऱ्यावर

संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतच काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीचे प्रतिनिधित्व राहुल गांधी यांनी केले.

पेगासस नावाचं हत्यार सरकारने आपल्या मोबाईल मध्ये घुसवले आहे आशा शब्दांत सरकारचा धिक्कार करत राहुल गांधी यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. या बैठकीत सरकारला 10 दिवसांची नोटीस देऊन चौकशी करण्यासंबंधी मागणी करण्यात येणार आहे. या मसुद्यावर राहुल गांधी यांनी स्वाक्षरी केली आहे.

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावर केंद्र सरकारला घेरणार

Pegasus spyware row: Senior journalists move Supreme Court, seek probe by sitting or former judge

काँग्रेस चे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही भारतात इतर देशाप्रमाणे चौकशी का होत नाही हा मुद्दा उपस्थित केला होता. प्रकरणी आयटी च्या तज्ञा अश्विनी वैष्णव यांनी या प्ररकरणावर उत्तर दिले होते. मात्र विरोधकांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडूनच उत्तर हवे आहे.

गृहमंत्री अमित शहा यांचेकडून उत्तर मागत हा प्रश्न विरोधकांनी संसदेत उपस्थित केला आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे येत असल्याचे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी