क्रीडा

जाणून घ्या ! कसे आहे आज सुरु होणाऱ्या ‘आशिया चषक 2022­­­­’ चे स्वरूप

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022)आजपासून युऐई (UAE) येथे सुरु होत आहे. या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ट्रॉफीसाठी एकूण सहा संघ खेळणार आहेत. नुकत्याच झालेल्या क्वालिफायरमध्ये कुवेत, हाँगकाँग, यूएई आणि सिंगापूर हे चार संघ सहाव्या स्थानासाठी लढले आणि यामध्ये हॉंगकॉंग (Hong kong cricket Team) संघ विजयी झाला. यापूर्वी भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ पात्र ठरले होते. 2018 मध्ये या स्पर्धा एकद‍िवशीय खेळवल्या होत्या. त्यावेळी भारताने बांगलादेशचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर जगभरामध्ये कोरोना महामारीचे संकट आले. सर्वच खेळांच्या स्पर्धा बंद होत्या.

या वर्षी होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहा संघांची दोन गटात विभागणी केली आहे. ‘अ’ गटात भारत (India), पाकिस्तान (Pakistan) आणि हाँगकाँगला तर ‘ब’ गटात श्रीलंका, बांग्‍लादेश आणि अफगाणिस्तानला ठेवण्यात आले आहे. स्पर्धेची सुरुवात ‘ब’ गटातील श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर (Dubai International Stadium) होणार आहे. त्यानंतर याच स्टेडियमवर ‘अ’ गटातील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना होणार आहे.

यावर्षीच्या फॉरमॅटमध्ये खेळत असताना, प्रत्येक गटातील तीन संघ त्यांच्या गटातील संघांसोबत प्रत्येकी दोन सामने खेळतील. त्यानंतर प्रत्येक गटातील दोन टॉप संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. सुपर फोर मधील संघाना तीन सामने खेळायला मिळणार असून, हे सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळले जाणार आहेत. या टॉप फोर संघातून दोन अव्वल संघ 11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. दरम्यान, यावर्षी स्पर्धेत एकूण 13 डाव खेळले जातील.

हे सुद्धा वाचा

Hemant Soren : झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात

Devendra Fadnavis : संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- देवेंद्र फडणवीस

अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती भक्तांचे विघ्न हरण करणारा ओझरचा ‘विघ्नेश्वर’

या स्पर्धेची सुरूवात श्रीलंकेत होणार होती, मात्र श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे यावर्षी आशिया चषक 2022 हा युएई (UAE) मध्ये खेळवला जाणार आहे.ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धा देखील खूप महत्वाच्या आहेत. आगामी सामन्यांसाठी अनेक संघांनी त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तानचे खेळाडू त्यांच्या होणाऱ्या सामन्यापूर्वी एकमेकांशी संवाद साधताना दिसून आले. कोरोना महामारीनंतर होणाऱ्या स्पर्धांकडे क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे.

संदिप इनामदार

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

4 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

4 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

4 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

5 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

11 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

12 hours ago