क्रीडा

IPL 2024: गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिलं मोठं विधान

IPL 2024 मध्ये रविवारला गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (Gujarat Titans vs Mumbai Indians) सामना खेळला गेला. हा सामना गुजरात टायटन्सने जिंकून या हंगामात विजयी सुरुवात केली आहे. गुजरातच्या टीमने प्रथम फलंदाजी करतांना 20 षटकांत 6 गडी गमावून 168 धावा केल्या. त्यांनतर मुंबईच्या टीम ने हे लक्ष पूर्ण करायचा प्रयन्त केला. पण ते प्रत्युत्तरात केवळ 162 धावा करू शकले. मुंबई इंडियन्सला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज होती. (IPL 2024 Hardik Pandya makes a big statement after losing to Gujarat Titans)

IPL 2024 मध्ये सामन्यादरम्यान धूम्रपान करताना दिसला शाहरुख खान, व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिल्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार मारून 10 धावा केल्या, मात्र तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. सामना झाल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, ‘आम्ही त्या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी खूप प्रयन्त केले, पण हा त्या दिवसांमधून एक आहे, जेव्हा आम्ही गती गमावली. परत येणे चांगले आहे कारण हे एक स्टेडियम आहे ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता, वातावरण खरोखर चांगले आहे आणि साहजिकच गर्दी भरली होती आणि त्यांना चांगला खेळही मिळाला. तिलक वर्माचा रशीदविरुद्ध एकही न घेतल्याबद्दल, मला वाटते की त्या वेळी तिलकला वाटलं असेल की ही एक चांगली कल्पना वाटली, मी त्याला पूर्ण पाठिंबा देतो, काही हरकत नाही, आमच्याकडे अजून 13 सामने खेळायचे आहेत.’

KKRकडून मिळालेल्या पराभवामुळे कर्णधार पॅट कमिन्सचे मन झाले दुःखी, सामान्यनंतर म्हटलं असं काही 

या विकेटसह मुंबई इंडियन्सच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. मुंबईला शेवटच्या 6 षटकात विजयासाठी 48 धावांची गरज होती आणि त्यांच्या सात विकेट्स शिल्लक होत्या. मात्र यानंतर गुजरात टायटन्सने जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला. मुंबई इंडियन्सकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने 46 आणि रोहित शर्माने 43 धावा केल्या.

IPL 2024 साठी इरफान पठाणची ‘विशलिस्ट’, विराट आणि रोहितबद्दल म्हटलं बरंच काही

याशिवाय गुजरातकडून उमरजई, स्पेंसन जॉन्सन, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शुभमन गिल प्रथमच आयपीएलमध्ये कर्णधार होता. कर्णधार म्हणून त्याने पहिलाच सामना जिंकला आहे. गुजरातच्या साई सुदर्शनला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यात आले.

 

काजल चोपडे

Recent Posts

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

11 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

11 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

11 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

11 hours ago

राजाभाऊ वाजेंच्या प्रचारासाठी डी.जी.सूर्यवंशी समन्वयक

नाशिक लोकसभा मतदार संघातील उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waze) यांच्या प्रचाराची धुरा सांभाळण्यासाठी महाविकास आघाडीचे…

12 hours ago

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

15 hours ago