27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाLSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू 

LSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू 

IPL 2024चा 15वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (LSG vs RCB) खेळाला गेला. हा सामना लखनऊच्या संघाने जिंकून गुणतालिकेत  चौथ्या क्रमांकावर आपली जागा बनवली आहे. या सामन्यात लखनऊच्या वेगवान गोलंदाज मयंक यादवने इतिहास रचला. मयंकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 14 धावा देऊन 3 बळी घेतले आहेत. (IPL 2024 LSG's Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

IPL 2024चा 15वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये (LSG vs RCB) खेळाला गेला. हा सामना लखनऊच्या संघाने जिंकून गुणतालिकेत  चौथ्या क्रमांकावर आपली जागा बनवली आहे. या सामन्यात लखनऊच्या वेगवान गोलंदाज मयंक यादवने इतिहास रचला. मयंकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 14 धावा देऊन 3 बळी घेतले आहेत. (IPL 2024 LSG’s Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यातही मयंक यादव पंजाब किंग्जविरुद्ध 3 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. आता त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसऱ्या सामन्यातही तो 3 बळी घेण्यात यशस्वी ठरला. मयंकला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता. (IPL 2024 LSG’s Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

IPL 2024: हार्दिक पांड्यानी दिलं ट्रोल करणाऱ्यांना उत्तर, पोस्ट शेअर करत म्हटलं असं काही…

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब देण्यात आला. पंजाब किंग्जविरुद्धचा सामना हा मयंकच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला सामना होता. त्या सामन्यातही त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.(IPL 2024 LSG’s Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

इतकेच नाही तर आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मयंकने 156.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून सर्वांना चकित केले. त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मयंकने 156 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्याचा पराक्रम केला. आता त्याने 156.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकून आरसीबीविरुद्ध खळबळ उडवून दिली.(IPL 2024 LSG’s Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

सलग तिसरा सामना हरल्यानंतर हार्दिक पांड्याने स्वतःला ठरवले जबाबदार, म्हणाला- ‘माझ्या विकेटने…’,

सामन्याबाबत बोलायचे झाले तर, लखनऊच्या संघाने आरसीबीला 28 धावांनी पराभूत करून आपला दुसरा विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुलच्या टीमने पहिले फलंदाजी करत 5 विकेट्सवर 181 धावा केल्या, त्यानंतर आरसीबी 19.4 षटकात केवळ 153 धावाच करू शकला. आरसीबी संघाला स्पर्धेतील आतापर्यंतचा तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबी आता गुणतालिकेत 9व्या स्थानावर घसरला आहे. (IPL 2024 LSG’s Mayank Yadav created history, becoming the first player to do so in the IPL)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी