IPL2024 मध्ये मंगळवारी आपला दुसरा सामना जिंकणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला मोठा झटका लागला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज शिवम मावी आता संपूर्ण आयपीएल 17 हंगामातून बाहेर आहे. शिवम दुखापतीमुळे हंगामातून बाहेर गेला आहे. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season) आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडू दुखापतीमुळे आपल्या संघाला सोडून गेले आहे, लखनऊचा कर्णधार केएल राहुल याच्या फिटनेसवर पण प्रश्न विचारले जात असतांना आता शिवम मावी संघाला सोडून गेला आहे.(IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)
मयंक यादवची गोलंदाजी पाहून चाहत्यांना आली शोएब अख्तरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केले अनेक मीम्स
You’ll come back stronger, Shivam. And we’re with you all the way. 💙 pic.twitter.com/zYSs3URV1p
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 3, 2024
लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मावी या हंगामातून बाहेर पडल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. फ्रँचायझीने त्यांच्यासाठी संदेशही लिहिला की, शिवम, तू जोरदार पुनरागमन करशील आणि या मार्गावर आम्ही तुझ्यासोबत आहोत. उल्लेखनीय आहे की शिवम मावीला लखनऊने 6.4 कोटी रुपये देऊन करारबद्ध केले होते. शिवम गेल्या वर्षी गुजरात टायटन्सचा भाग होता पण एकही सामना खेळला नाही. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने आयपीएलमधून बाहेर आहे. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)
LSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
You’ll come back stronger, Shivam. And we’re with you all the way. 💙 pic.twitter.com/zYSs3URV1p
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 3, 2024
शिवम मावीने लखनऊ सुपर जायंट्स व्हिडिओमध्ये संपूर्ण हंगामातून बाहेर राहण्याबाबत सांगितले की, ‘मला याची खूप आठवण येईल. दुखापतीनंतर मी पुनरागमन केले आणि माझ्या संघासाठी काही सामने खेळण्याचा विचार केला. पण दुर्दैवाने दुखापतीमुळे मला जावे लागले. अशा दुखापतीतून पुनरागमन कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी क्रिकेटपटूला मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. यातुन तुम्ही कसे लवकर बरे होणार? हे सगळे प्रश्न मनात येतात.” (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)
IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा
तुम्हाला सांगते की, या हंगामात लखनऊच्या संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी मार्क वुड आणि डेव्हिड विली यांनी आपली नावे मागे घेतली होती. वुडला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बोलवून घेतले. तर विलीने वैयक्तिक कारणांमुळे आपले नाव मागे घेतले. वुडच्या जागी शामर जोसेफ आणि विलीच्या जागी मॅट हेन्रीने संघात प्रवेश केला. आता शिवम मावीच्या रूपाने संघाला चालू हंगामात तिसरा धक्का बसला. (IPL 2024 lucknow super giants Shivam Mavi ruled out full season)