क्रीडा

‘रोहितला कर्णधारपदावरून काढणे म्हणजे…’, मायकल वॉनने मुंबई इंडियन्सला सुनावले

IPL 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवून त्यांच्या जागेवर हार्दिक पांड्याला घेण्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने प्रश्न उपस्थित केला आहे. 48 वर्षीय माजी इंग्लिश खेळाडूने या खेळाच्या इतिहासातील सर्वात विचित्र हालचाली पैकी एक असल्याचे वर्णन केले. (Michael Vaughan on hardik pandya replacing rohit sharma as mi captain in ipl 2024) मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेतले. हार्दिक दोन वर्षांपूर्वी मुंबई इंडियन्स सोडून गुजरात टायटन्समध्ये गेला. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने दोन वेळा फायनल गाठली ज्यामध्ये एकदा संघाने विजेतेपद पटकावले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स 2013 पासून 5 वेळा चॅम्पियन बनली आहे. (Michael Vaughan on hardik pandya replacing rohit sharma as mi captain in ipl 2024)

जुन्या अवतारात दिसला रोहित शर्मा, SRH विरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्याला दिला ‘ऑर्डर’

बुधवार मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना खेळण्यात आला. हा सामना आयपीएल 2024 चा मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना होता. या सामन्यादरम्यान मायकल वॉनने मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते. या सामन्यातही हार्दिक पांड्याचं काही चांगला कर्णधार म्हणून दिसून आला नाही. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 277 धावांचा मोठा स्कोअर बोर्डावर ठेवला, त्याला प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 246 धावाच करू शकला. मायकल वॉनने ‘X’ वर लिहिले, ‘मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून रोहितला काढून टाकणे ही खेळातील सर्वात विचित्र गोष्टींपैकी एक आहे..’ (Michael Vaughan on hardik pandya replacing rohit sharma as mi captain in ipl 2024)

याशिवाय माजी इंग्लिश कर्णधाराने दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनचेही कौतुक केले. केवळ क्लासेनच्या नाबाद 80 धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला ही मोठी धावसंख्या गाठण्यात यश आले. वॉनने त्याच्याबद्दल लिहिले, ‘बाय द वे… हेनरिक क्लासेन असा खेळाडू आहे… जो व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये मिडल ऑर्डर स्ट्रायकर म्हणून अव्वल आहे.’ (Michael Vaughan on hardik pandya replacing rohit sharma as mi captain in ipl 2024)

सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पॉइंट टेबल बदलले, या 4 टीम आहे टॉप वर

आयपीएल 2024 चा आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळला गेला. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळला गेला. हैदराबादची विकेट एकदम सपाट आहे हे दोन्ही संघांना माहीत होते, पण ते कोणालाच माहीत नव्हते विकेट इतकी सपाट असेल की एका सामन्यात 500 पेक्षा जास्त धावा होतील, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेड (62), अभिषेक शर्मा (63) आणि हेनरिक क्लासेन (80) यांच्या 12 धावा केल्या. हैदराबादच्या संघाने 277 धावा फलकावर लावल्या. (Michael Vaughan on hardik pandya replacing rohit sharma as mi captain in ipl 2024)

हार्दिक पांड्याने सांगितले मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण, जाणून घ्या काय म्हणाला MI चा कर्णधार

आयपीएलच्या इतिहासातील एका संघाने केलेली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सनेही आपली ताकद दाखवली, पण मुंबई संघ 31 धावांनी मागे राहिला. रोहित शर्मा (34) आणि इशान किशन (26) यांनी मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर नमन धीर (30) आणि तिलक वर्मा (64) यांनीही शानदार खेळी खेळली, पण मुंबई संघाला या डोंगरासारख्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही.

काजल चोपडे

Recent Posts

नरेंद्र मोदी फेकाडे, इंदिरा गांधी कर्तृत्ववान

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश…

51 mins ago

मराठी माणसांनो, चालते व्हा; मुंबई गुजरात्यांसाठी खाली करा

   मुंबई आता मराठी माणसांची राहिलेली नाही. म्हणून मराठी माणसांनो तुम्ही मुंबईतील तुमची घरं विका.…

1 hour ago

गुगलची मेहरबानी, ‘लय भारी’ची प्रगती !

‘गुगल’ने आज ‘लय भारी’ला विशेष प्रमाणपत्र प्रदान केले आहे. असे प्रमाणपत्र मिळवणारे ‘लय भारी न्यूज’…

3 hours ago

मतदान जनजागृतीसाठी नाशिक मनपातर्फे चित्रकला व मेहंदी स्पर्धेचे आयोजन

नाशिक महापालिका (NMC) व क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवारी (दि.8) शहरातील गोल्फ क्लब येथे…

6 hours ago

नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या आठवडाभरापासून वाहनांच्या टोईंगची (Towing) कारवाई सुरू झालेली आहे. मात्र असे…

6 hours ago

रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या; EVM मशीनची केली पूजा; दाखल झाला गुन्हा

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा (worship of EVM…

7 hours ago