35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडासनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पॉइंट टेबल बदलले, या 4 टीम आहे टॉप वर 

सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पॉइंट टेबल बदलले, या 4 टीम आहे टॉप वर 

IPL 2024चा आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आणि या हंगामातील पहिला विजय मिळवला. मुंबईवरील विजयासह हैदराबादने ही पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे. एवढेच नाही तर हैदराबादचा संघ ताज्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2024 Points Table changed after Sunrisers Hyderabad's win, these 4 teams are at the top) 

IPL 2024चा आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers hyderabad) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला आणि या हंगामातील पहिला विजय मिळवला. मुंबईवरील विजयासह हैदराबादने ही पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले आहे. एवढेच नाही तर हैदराबादचा संघ ताज्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (IPL 2024 Points Table changed after Sunrisers Hyderabad’s win, these 4 teams are at the top)

मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद तुफानी फलंदाजी केली, त्यामुळे नेट रनरेटमध्येही बरीच सुधारणा झाली आहे. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्स पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईने आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या हैदराबाद तिसऱ्या तर केकेआर चौथ्या स्थानावर आहे. (IPL 2024 Points Table changed after Sunrisers Hyderabad’s win, these 4 teams are at the top)

हार्दिक पांड्याने सांगितले मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण, जाणून घ्या काय म्हणाला MI चा कर्णधार

यानंतर पंजाब किंग्ज पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आत्तापर्यंत 2 सामने खेळले आहेत ज्यात एक जिंकला आहे तर दुसऱ्यात पराभव झाला आहे. आरसीबीने 2 सामने देखील खेळले आहेत, एक जिंकला आणि एक गमावला आणि सहाव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स संघ सातव्या क्रमांकावर आहे. गुजरातनेही दोनपैकी एक सामना जिंकला आहे. दिल्ली कॅपिटल्स आठव्या क्रमांकावर तर मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे. याशिवाय लखनौ सुपरजायंट्स संघ शेवटच्या स्थानावर म्हणजेच १० व्या क्रमांकावर आहे. लखनौने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. (IPL 2024 Points Table changed after Sunrisers Hyderabad’s win, these 4 teams are at the top)

42 वर्षीय MS धोनीची चपळाई पाहून सर्व झाले थक्क, 0.6 सेकंदात 2.3 मीटरची उडी मारून झेलला चेंडू, पहा व्हिडिओ

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हेनरिक क्लासेन सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. क्लासेनने 2 सामन्यात 143 धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे, कोहलीने 2 सामन्यात 98 धावा केल्या आहेत, तिसऱ्या स्थानावर अभिषेक शर्मा आहे ज्याच्या नावावर आता 2 सामन्यात 95 धावा झाल्या आहेत. याशिवाय तिलक वर्मा चौथ्या क्रमांकावर आहेत. तिलक वर्माने आतापर्यंत दोन सामन्यांत 89 धावा केल्या आहेत. सॅम कुरन पाचव्या क्रमांकावर आहे. कुरनने 2 सामन्यात 86 धावा केल्या आहेत. (IPL 2024 Points Table changed after Sunrisers Hyderabad’s win, these 4 teams are at the top)

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्माला घेऊन नवज्योत सिंग सिद्धूने दिले मोठं विधान

त्याचवेळी, सध्या सर्वाधिक विकेट घेणारा मुस्तफिजुर रहमानने आतापर्यंत 2 सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हरप्रीत ब्रारने आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 3 बळी घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर रबाडा आहे ज्याने आतापर्यंत 2 सामन्यात 3 बळी घेतले आहेत. टी नटराजनने आत्तापर्यंत एक सामना खेळला असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. नटराजन पाचव्या क्रमांकावर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी