क्रीडा

Rohit Sharma Fan : कर्णधार रोहितच्या फॅन्सची बातच न्यारी; चालू सामन्यात चाहता मैदानात शिरला अन्…

भारतीय क्रिकेट संघाचे चाहते सध्या संपूर्म जगात विखुरलेले आहेत. संघ ज्या ठिकाणी सामना खेळण्यासाठी पोहोचते त्या ठिकाणी त्यांचे मोठ्या प्रमाणावर असलेल्या गर्दीतून स्वागत केले जाते. अनेकदा चाहते खेळाडूंना भेटण्यासाठी त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी किंवा खेळाडूंशी हातमिळवणी करून त्यांना मिठी मारण्यासाठी आसुसलेले असतात. अशा परिस्थितीत अनेकदा चाहत्यांच्या भावना अनावर झाल्याने चाहते नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. असाचकाहीसा प्रकार घडला तिरुअनंतपूरम येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या टी20 सामन्यांत. यावेळी एक चाहता थेट मैदानातील सर्व मर्यादा ओलांडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला भेटण्यासाठी थेट मैदानात येऊन पोहोचला.

कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. विशेषत: भारतीय संघाचे कर्मधारपद रोहितच्या खांद्यावर आल्यापासून त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी सामना संपल्यानंतरही मैदानात थांबलेले दिसतात. अनेकदा रोहित सामना संपल्यानंतर काही वेळ काढून चाहत्यांना भेट देताना दिसला आहे. मात्र, बुधवारी (27 सप्टेंबर) एक चाहता सामन्याच्या पहिल्या डावानंतर थेट मैदानात सिरला आणि रोहितच्या पायावर जाऊन लोटांगण घातले. कारण त्याला रोहित शर्माला भेटायचे होते. त्याने हे केले आणि त्यानंतर मैदानावरच रोहित शर्माच्या पायाला स्पर्श केला. मात्र, नंतर त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते आणि या क्रिकेट चाहत्याला यापुढे स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नाही, कारण हा एक प्रकारचा सुरक्षेचा भंग असल्याचे बोलले जात असले तरी चाहत्यांची ही क्रेझ वेगळीच असल्याचे पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

Virus Crises : कोरोनानंतर ‘या’ व्हायरसने वाढवली पुन्हा धाकधूक

INDvsSA T20I : भुवी-बुमराहशिवायही भारतीय गोलंदाजी जगात भारी; पहिल्याच सामन्यात आफ्रिका गारद

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

अनेकदा क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी अशी कृत्ये करतात. मात्र, रोहित शर्मा हा वेगळा क्रिकेटर आहे. तो स्वत: मॅच संपल्यानंतर बहुतेक वेळा चाहत्यांना भेटण्यासाठी पोहोचतो, पण या चाहत्याला धीर नव्हता आणि तो मैदानात उतरला. मात्र, आजपर्यंत त्या पंख्यावर स्टेडियम प्रशासनाकडून कोणतीही तक्रार किंवा कारवाई झालेली नाही.

दरम्यान, याआधी असा प्रसंग काही वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत झाल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यावेळी चालू सामन्यात एक भारतीय चाहता तिरंगा झेंडा हातात घेऊन मैदानात शिरला आणि थेट धोनीच्या पायाशी जाऊन बसला. त्यावेळी धोनीने तिरंगा झेंडा जमिनीला स्पर्श होऊ नये याची खबरदारी घेत चाहत्याला उभे केले आणि त्याला मिठी मारली. विशेष म्हणजे ही दृश्ये पाहिल्यानंतर भारतीय चाहते क्रिकेटपटूंना देवासमान दर्जा देत असल्याचे वारंवार जाणवते.

प्रणव ढमाले

Recent Posts

उमेश कामत आणि प्रिया बापटसोबत ‘जर तरची गोष्ट’ रंगणार

सुपरस्टार उमेश कामत आणि प्रिया बापट (Umesh Kamat and Priya Bapat) यांची प्रमुख भूमिका असलेले…

16 mins ago

नाशिक मधील निओमेट्रोचा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत संपली

वेगाने वाढणाऱ्या नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

32 mins ago

महाविकास आघाडीतर्फे पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे,नाना पटोले यांच्या प्रचार सभा

नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार राजाभाऊ वाजे यांना सर्व थरातून…

2 hours ago

पुरातत्व खात्याचा संचालक तेजस गर्गे फरार, पोलीस पथके रवाना

अडीच लाख दरमहा पगार घेणारे आणि नाशिकमधील प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे यांचे सुपुत्र राज्य पुरातत्त्व…

2 hours ago

मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला शिक्षक गैरहजर….. ???

दि. ८ मे रोजी भारत निर्वाचन आयोगाने प्रेस नोट जारी करत मुंबई शिक्षक मतदार संघ…

2 hours ago

नरेंद्र मोदींच्या सभेआधी कांदा खरेदी ठरणार दिवास्वप्नच

काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सभेत देवळा तालुक्यात कांदाफेक…

3 hours ago