29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

काॅंग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक गौप्यस्फोट केल्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काॅंग्रेसमधून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया आलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्याच जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाची हाक दिली आणि एक स्वतंत्र गटच स्थापन केला. या बंडामुळे राज्यातील राजकारण पुर्णतः ढवळून निघाले आणि कधीही न पाहिलेले, अनुभवलेले वेगळेच राजकीय पडसाद पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे केवळ बंडापुरतेच मर्यादित राहिले नाहित तर त्यांनी लगेचच भाजपशी हात मिळवणी केली आणि महाविकास आघाडीचे कारण पुढे करत त्यांनी आपली बाजू राखण्याचा वारंवार प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केलीच परंतु काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबतीचा सुद्धा उल्लेख करीत नाराजी दर्शवली होती. परंतु त्यांच्या वारंवार होणाऱ्या आरोपांवर काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सडेतोड उत्तर देत शिंदेंच्या बंडाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.

काॅंग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक गौप्यस्फोट केल्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर काॅंग्रेसमधून पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया आली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्याच जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. पण सत्ता स्थापनेसाठी 2014 मध्येच शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता असे म्हणून एक वेगळीच बाब त्यांनी समोर आणली आहे.

हे सुद्धा वाचा…

Success Story : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर ‘या’ गावाने पहिल्यांदाच पाहिली सरकारी नोकरी

Pushpa of Nagpur : नागपूरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळयात सापडला

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींचे 30 तारखेपर्यंत मौन

अशोक चव्हाण पुढे म्हणतात, विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते आणि प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास त्यावेळी सुचवलं होतं. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. 2015 आणि 2019 मध्ये भाजप युतीचे सरकार होते. नंतरच्या काळात भाजप शिवसेनेत कुरबुरी होत्या आणि त्यांनी युती असतानाही शिवसेना आणि भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादीवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे स्पष्ट केले आहे.

सदर प्रस्ताव घेऊन शिवसेना नेते अशोक चव्हाणांच्या चर्चगेट येथील कार्यालयात गेले होते आणि तिथेच याबाबतीत सगळी चर्चा झाल्याचे चव्हाणांनी सांगितले आहे. अशोक चव्हाण यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर शिंदेगटात मात्र चांगलीच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे, शिवाय एकनाथ शिंदे यांनी ज्या कारणामुळे बंड केले त्यावरच आता शंका उपस्थित करण्यात येत आहे. हिंदुत्वाशी केलेली तडजोड, शिवसेना नेत्यांना मिळालेला दुय्यम दर्जा आणि उद्वव ठाकरेंना कोणासाठी न मिळणारा वेळ अशी अनेक कारणे एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी दिली होती परंतु अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर या सगळ्या कारणांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, शिंदे गटाची पाठराखण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी अशोक चव्हाणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात, अशोक चव्हाण यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकनाथ शिंदे गेलेही असतील. पण पक्षाचे नेते सांगतात तेव्हा जावं लागतं. आणि शिवसेनेसोबत जा, असं सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांना सांगितल्यावर त्यांनाही जावं लागलं असतं असे म्हणत त्यांनी अशोक चव्हाणांना सुद्धा मिश्किल टोला लगावला आहे. राज्याच्या राजकारणात रोजच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत परंतु ज्या कारणासाठी ही उलथापालथ झाली ते कारणच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगाशी येईल का हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी