29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यVirus Crises : कोरोनानंतर 'या' व्हायरसने वाढवली पुन्हा धाकधूक

Virus Crises : कोरोनानंतर ‘या’ व्हायरसने वाढवली पुन्हा धाकधूक

संशोधकांनी कोरोनासारखाच आणखी एक घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. खोस्ता-2 नावाचा हा नवा विषाणू असून रशियन वटवाघळांमध्ये संशोधकांना आढळून आलेला आहे. या व्हारसचा संसर्ग पसरण्याचा धोका संशोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

दोन वर्षांहून अधिक काळ केवळ देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हारसमुळे सगळेच जण मेटाकुटीस आले होते, परंतु त्यावर लस, योग्य उपचार यांच्या उपलब्धीमुळे यावर लगेचच आवर घालणे सोपे गेले म्हणून सगळ्यांनी एकप्रकारे सुटकेचा निश्वास टाकला त्यामुळे पुन्हा सगळे बिनधास्तपणे वावरताना दिसू लागले आहेत. परंतु, धोका अद्याप टळलेला नाही असे संशोधकांकडून अजूनही सांगण्यात येत आहे. कोरोना कधी संपणार यावर अजून कोणाकडूनही खात्रीशीर उत्तर येत नसले तरीही आणखी एक संकट आ वासून उभे राहिले आहे. संशोधकांनी कोरोनासारखाच आणखी एक घातक व्हायरसबाबत इशारा दिला आहे. खोस्ता-2 (Khosta 2) नावाचा हा नवा विषाणू असून रशियन वटवाघळांमध्ये संशोधकांना आढळून आलेला आहे. या व्हारसचा संसर्ग पसरण्याचा धोका संशोधकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये खोस्ता-2 नावाचा नवा विषाणू आढळून आलेले असून हा व्हायरस (SARS-CoV-2) व्हायरस सारखाच आहे. या व्हायरसवर प्राथमिक संशोधन झाले असून हा व्हायरस मानवी शरीरात सहजपणे प्रवेश करू शकतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेव्हा कोरोना संसर्गाचा धोका उद्भवला त्याचवेळी संशोधकांना आणखी एका विषाणूची कुणकुण लागली.

एक असा व्हायरस जो कोरोना प्रमाणाचे जास्त संसर्ग होणारा आणि वटवाघुळ, पॅंगोलिन, कुत्रे आणि डुक्कर यांच्यात सहजपणे आढळून येणारा व्हायरस म्हणजेच खोस्ता-2. कोरोना संसर्गाचे संकटच इतके मोठे होते की त्यामुळे या खोस्ता-2 व्हयरसकडे संशोधकांचे थोडे दुर्लक्षच झाले. या व्हायरसला त्यावेळी कोणीच गांभीर्याने घेतलेच नाही, त्यावेळी कोणती त्याबाबतची लक्षणे सुद्धा दिसून आली नव्हती म्हणून याकडे कोणी फारसे लक्ष सुद्धा दिले नाही.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना बंडाची खेळी पडणार भारी

Success Story : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर ‘या’ गावाने पहिल्यांदाच पाहिली सरकारी नोकरी

Pushpa of Nagpur : नागपूरचा ‘पुष्पा’ पोलिसांच्या जाळयात सापडला

दरम्यान खोस्ता-2 वर नुकतेच प्राथमिक संशोधन झाले, त्यामधून काही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या संशोधनातून हा कोरोना प्रमाणेच जास्त संक्रमित करणारा व्हायरस असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे पुन्हा जगावर संकट कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खोस्ता-2 आणि कोरोना व्हायरस हे एकाच गटातील विषाणू असले तरीही खोस्ता-2 या विषाणूवर अद्याप कोणतीच प्रभावी अशी लस उपलब्ध नाही. कोरोनासारखंच खोस्ता विषाणू सुद्धा मानवाच्या रीरातील पेशींवर हल्ला करतो, त्यामुळे हा व्हायरस सुद्धा गंंभीर असल्याते म्हटले जात आहे.

सध्या खोस्ता-2 हा व्हायरस वटवाघुळ, पॅंगोलिन, रॅकून आणि कुत्रा या प्राण्यांमध्ये पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. खोस्ता-2 ची आतापर्यंत कोणत्या मानवाला लागण झाल्याचे समोर आलेले नाही, परंतु यावर बोलताना मायकेल लेटको म्हणतात की, हा व्हायरस भविष्यात कोरोनासारखंच महामारीचं रूप धारण करू शकतो. विशेषत: कोविड विषाणूसह तो मानवांपर्यंत पोहोचला तर मात्र हा व्हायरस प्राणघातक ठरू शकतो, असे म्हणून लेटको यांनी संभाव्य धोक्याची घंटा बडवली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी