क्रीडा

Ronaldo Retirement : ‘रोनाल्डोचा फुटबॉलला रामराम!’ मोठी अपडेट आली समोर

फुटबॉल हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळात आजवर अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले मात्र, या सर्वांमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी फुटबॉल सामना पाहणारे प्रेक्षकही मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोनाल्डो निवृत्त होणार असल्याची बातमी येत होती. आता खुद्द रोनाल्डोनेच या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे पुढच्या 2 वर्षांपर्यंत तरी आपला निवृत्तीचा निर्धार करणार नसल्याचे रोनाल्डोने स्पष्ट केले आहे. आपल्याला आता युरो 2024 पर्यंत फुटबॉल खेळायचे आहे. अशी माहिती स्वत: रोनाल्डोने एका पुरस्कार सोहळ्यात दिली.

ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पोर्तुगाल देशासाठी सर्वाधिक गोल्स करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला फुटबॉल फेडरेशन ऑफ पोर्तुगालने (FPF) लिस्बन येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना रोनाल्डो म्हणाला की, “माझा प्रवास अजून संपलेला नाही. मला विश्वचषक आणि युरोचा भाग व्हायचे आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे आणि माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे.”

रोनाल्डोने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत पोर्तुगालसाठी एकुण 189 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने तब्बल 117 गोल्स आपल्या नावे केले. शिवाय, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. त्यावेळी त्याने आयर्लंड संघाविरुद्ध गोल करत इराणच्या अली दाऊचा 109 गोल्सचा विक्रम मोडीत काढला होता. सध्या रोनाल्डो कतार येथे नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या 2022विश्वचषकात आपल्या देशाकडून खेळताना दिसेल. ही त्याच्या कारकिर्दीतील 10वी प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Big Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये मिस इंडिया उपविजेती पसरवणार सौंदर्याची जादू

ODI IND vs AUS : ‘कार्तिक फिनिशर होऊ शकत नाही!’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

NIA : मोठी बातमी : दहशतवादी कारवाया करण्याची सुपारी घेतलेली संघटना एनआयए , ईडीच्या रडारवर, 13 राज्यात छापेमारी

ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या मँचेस्टर युनायटेड संघाकडून फुटबॉल खेळत आहे. गेल्या हंगामात मँचेस्टरसाठी खेळताना रोनाल्डोला विशेष कामगिरी करता आली नव्हती, त्यामुळे तो यंदा मँचेस्टर युनायटेडची साथ सोडू शकतो, अशा चर्चांना उधाणं आले होते. मात्र, यंदाच्या हंगामातही रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड संघातून आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाला आहे.

दरम्यान, फुटबॉल व्यतिरिक्तदेखील रोनाल्डोच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही रोनाल्डोला फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एकट्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोनाल्डोचे तब्बल 481 मिलियन फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत रोनाल्डोचा पहिला क्रमांक लागतो. त्यामुळे तो पुढील 2 वर्षतरी फुटबॉलपासून दूर होणार नाही या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंद पसरला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

2 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

3 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

3 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

4 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

4 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

6 hours ago