मनोरंजन

Big Boss 16 : बिग बॉस 16 मध्ये मिस इंडिया उपविजेती पसरवणार सौंदर्याची जादू

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये भाईजान म्हणून प्रचलित असलेला सल्मान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमाची नेहमीच प्रेक्षकांना आतुरता असते. या कार्यक्रमाचा 16वा हंगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यावेळी बिग बॉसच्या या 16व्या हंगामात कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याबाबातही अनेक चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना हळूहळू पुर्णविराम लागत आहे. बिगबॉस 16 बाबतीत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. फेमिना मिस इंडिया 2020ची उपविजेती मान्या सिंग यावेळी एक स्पर्धक म्हणून शोमध्ये प्रवेश करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मान्या सिंग ही कार्यक्रमातील पहिली जाहिर केलेली स्पर्धक आहे. मान्याच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी तिच्या एंट्रीबाबत सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मान्या सिंग तिच्या ग्लॅमरस, लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. विशेष म्हणजे तिच्या मनमोहक अदा आणि सुंदरतेवर अनेक चाहते फिदा आहेत. त्यामुळे आता मान्या बिग बॉसमध्ये सहभागी होत असल्याची बातमी ऐकुण चाहत्यांमधील उत्साह द्विगुणित झाला आहे.

हे सुद्धा वाचा…

ODI IND vs AUS : ‘कार्तिक फिनिशर होऊ शकत नाही!’ ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

NIA : मोठी बातमी : दहशतवादी कारवाया करण्याची सुपारी घेतलेली संघटना एनआयए , ईडीच्या रडारवर, 13 राज्यात छापेमारी

ODI INDW vs ENGW : 23 वर्षांची प्रतिक्षा संपली! भारतीय महिलांनी इंग्लंडच्या धर्तीवर जिंकली वनडे मालिका

सलमान खान बऱ्याच दिवसांपासून हा कार्यक्रम होस्ट करत आहे. या शोमध्ये देशातील आणि जगातील अनेक प्रसिद्ध स्टार्स सहभागी झाले आहेत. ‘बिग बॉस’ने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्टार्सना जवळून जाणून घेण्याची संधी दिली आहे. असे सांगितले जात आहे की ‘बिग बॉस 16’ मागील सर्व हंगामांपेक्षा खूप वेगळा असणार आहे. यंदाच्या हंगामाचा प्रीमियर एपिसोड दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. त्याचा दुसरा भाग 2 ऑक्टोबरला प्रसारित होणार आहे. यासोबतच ‘बिग बॉस 16’ च्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमान खानसोबत शहनाज गिल दिसणार असल्याची चर्चा आहे. साहजिकच त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, प्रत्येकवेळी बिगबॉसमध्ये कोणकोण सहभागी होणार याची चर्चा होत असते. त्याचप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत. कनिका मान, पूनम पांडे, जन्नत जुबेर, फैजल शेख (मिस्टर फैसू), राज कुंद्रा, शिवीन नारंग, फहमान खान आणि मुनावर फारुकी यामध्ये स्पर्धक म्हणून दिसतील. या सर्वांशिवाय लोकसभा सदस्य आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांच्या नावाचीही चर्चा आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकच्या रस्त्यांवर धावणार 50 इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून पीएम ई बस (PM E Bus) या योजनेंर्तग देशातील २० लाखांच्या…

2 hours ago

सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस

जेडीएसचे नेते प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवण्णा यांच्या सेक्स टेप…

3 hours ago

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

15 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

16 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

16 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

16 hours ago