29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeसंपादकीयNIA : मोठी बातमी : दहशतवादी कारवाया करण्याची सुपारी घेतलेली संघटना एनआयए...

NIA : मोठी बातमी : दहशतवादी कारवाया करण्याची सुपारी घेतलेली संघटना एनआयए , ईडीच्या रडारवर, 13 राज्यात छापेमारी

नॅशनल इंन्वेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एनआयए (NIA) ने गुरूवारी मध्यरात्री 13 राज्यात धाडसत्र सुरू केले आहे. यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय कंपनीच्या अनेक कार्यालयांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

पॉप्युलर फ्रंट इंडियाच्या विविध ऑफ‍िसमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून मालमत्तेवर छापे टाकण्यात येत आहेत. महाराष्ट्रात नाश‍िक जिल्हयातील मालेगाव येथे पाीएआय संघटनेच्या सैफुरहेमान याला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुण्यातील कोंढवामधून याच संघटनेचा पदाधिकारी अब्दुल शेख आणि रझाा खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.नवी मुंबईत देखील धाड पडली आहे.अशाच प्रकारच्या धाडी देशात विविध ठिकाणी पडल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यांत देखील धाडसत्र सुरू आहे.नॅशनल इंन्वेस्टिगेशन एजन्सी म्हणजे एनआयए (NIA)ने गुरूवारी मध्यरात्री 13 राज्यात धाडसत्र सुरू केले आहे.यामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय कंपनीच्या अनेक कार्यालयांवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे.दीर्घकाळ ही छापेमारी करण्यात येणार आहे.

दहशतवादी कारवायांशी या कंपनीचा सहभाग असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात येत आहे. ही संघटना दहशतवाद्यांना फंड (पैसा) पुरवत होती. यामध्ये या संघटनेचा म्होरक्या ओमा सालम याचा सहभाग आहे. देशातील विविध राज्यात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, पाँडेचरी आण‍ि राज्यस्थानचा यामध्ये सहभाग आहे. या प्रकरणी गृह मंत्रालयात अमित शाह यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये एनएसए अजित डोभाल तसेच गृहसचिव अजय भल्ला देखील उपस्थित होते. एनआयए, ईडी आणि राज्य पोलिस ही छापेमारी करत आहेत. या छापेमारी विरोधात पीएफआय कार्यकर्ते विरोधी प्रदर्शन करत आहेत. केरळच्या मल्लपुरम, तामिळनाडूच्या चेन्नई, कर्नाटकच्या मंगळूरुमध्ये कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले आहेत.

कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आमचा आवाज दाबण्यासाठी आमच्या केंद्रीय तपास यंत्रणा ही करवाई करत आहेत. तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये तसेच तेलंगणामधील चंद्रगुटटृामध्ये एनआएने पीएफआयचे कार्यलय सील केले आहे. मंगळूरुमध्ये पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या संघटनेच्या रडावर मोठे नेते असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकरणी पटणामध्यून अतहर आणि अल्लाउद्दीन नावाच्या दोघांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे 2047 नावाचे कागदपत्रे सापडली आहेत.
हे सुद्धा वाचा

यामध्ये 25 वर्षांमध्ये भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचे प्लानिंग करण्यात आल्याच उल्लेख आहे. या प्रकरणी एनआयएने सप्टेंबरमध्ये बिहारमध्ये देखील छापेमारी केली होती. झारखंडमध्ये या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. तपास यंत्रणा पीएफआयला फंड कुठून येतो याची चौकशी करत आहेत. सामाजात तेढ निर्माण करण्यासाठी या फंडाचा वापर करण्यात येतो. देशामध्ये अशांतता निर्माण करुन दंगे घडविण्याचे कट करास्थान ही संघटना करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी