क्रीडा

Womens Asia Cup : ‘हमारी छोरीया छोरो से कम है के?’ भारतीय महिला संघाचा दबदबा, अवघ्या 37 धावांत गुंडाळला विरोधी संघाचा डाव

सध्या महिला आशिया चषक स्पर्धा बांग्लादेश येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील भारतीय महिला संघाचा सामना सोमवारी (10 ऑक्टोबर) थायलंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध नियोजित करण्यात आला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करत असताना थायलंडच्या महिला संघाला केवळ 37 धावांवर रोखले आहे. त्यानंतर .या छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारतीय महिला संघाने 9 विकेट्स राखत विजय मिळवला. शिवाय हे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय महिला संघाने केवळ 6 षटके घेतली. यावेळी भारतासाठी एस मेघना हिने सर्वाधिक नाबाद 20 धावांची खेळी केली.

सोमवारी महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना थायलंडला 15.1 षटकात 37 धावांत गुंडाळले. थायलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. त्याच्याकडून नानपत कोंचनारिओनकाई (12) या एका फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला.भारताकडून स्नेह राणाने 3 तर राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2 गडी बाद केले. मेघना सिंगला एक विकेट मिळाली. भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. या सामन्यात नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरही खेळली नाही. तिच्या जागी स्मृती मंदाना कर्णधार होती. तर, रेणुका सिंगच्या जागी मेघना सिंगचा संघात समावेश करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

Mid-Day Meal Programme: अर्थ मंत्रालयाच्या मंजूरीनंतर शिक्षण मंत्रालयाने मिड-डे मील योजनेमध्ये जेवण बनविण्याच्या खर्चात केली वाढ

Phone Bhoot Trailer Out : कतरिना अन् जॅकी दादाची हॉरर कॉमेडी! ‘फोन भूत’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ला उदंड प्रतिसाद; राज्यात अनेक ठिकाणी शाखांची स्थापना सुरू

विशेष म्हणजे यावेळी भारताने हे लक्ष्य केवळ 6 षटकांत पूर्ण केल्याने भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवला आहे. आजवर भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक चेंडू राखत विजय मिळवला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने 120 पैकी 84 चेंडू बाकी ठेवत सामन्यात विजय मिळवला. याआधी भारताने 2011साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 58 चेंडू राखत विजय मिळवला होता.

टी20 मध्ये भारतीय महिला संघाचा सर्वात मोठा विजय: (चेंडू बाकी)

84 वि थायलंड, 2022

58 वि ऑस्ट्रेलिया, 2011

57 वि वेस्ट इंडीज, 2019

54 वि दक्षिण आफ्रिका, 2021

46 वि ऑस्ट्रेलिया, 2012

प्रणव ढमाले

Recent Posts

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

27 mins ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

52 mins ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

2 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

2 hours ago

नाशिकवरील ड्रग – वाईन कॅपिटलचा शिक्का पुसणार,शांतीगिरी महारांजाचा संकल्प

नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…

4 hours ago

तळीराम खरे बोलतात; नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंविषयी खूपच बोलले !

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

5 hours ago