28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeमनोरंजनPhone Bhoot Trailer Out : कतरिना अन् जॅकी दादाची हॉरर कॉमेडी! 'फोन...

Phone Bhoot Trailer Out : कतरिना अन् जॅकी दादाची हॉरर कॉमेडी! ‘फोन भूत’ सिनेमाचा ट्रेलर आऊट

कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धान्त चतुर्वेदी स्टारर हॉरर कॉमेडी 'फोन बूथ' चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये भीतीसोबतच कॉमेडीचाही डोस पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. या चित्रपटात कतरिना कैफ भूत बनली आहे.

कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धान्त चतुर्वेदी स्टारर हॉरर कॉमेडी ‘फोन बूथ’ चा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरमध्ये भीतीसोबतच कॉमेडीचाही डोस पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. या चित्रपटात कतरिना कैफ भूत बनली आहे. सिद्धांत आणि ईशानला भूत पाहण्याची शक्ती मिळते. त्यानंतर दोघेही भूत पकडताना दिसतात. कतरिना या दोघांना कल्पना देते. आणि त्यानंतर दोघे कतरिनासोबत त्यांची योजना पूर्ण करण्यासाठी निघाले. इशान आणि सिद्धांत हरवलेल्या आत्म्यांना मोक्ष मिळवून देण्याचे काम करतात. यामध्ये कतरिना दोघांचीही मदत करते. त्यानंतर जॅकी श्रॉफची एंट्री आहे. जॅकी दादा या चित्रपटात आत्माराम नावाचा तांत्रिक खलनायक बनला आहे. जो आत्म्यांना कैद करतो. यानंतर अनेक मजेदार आणि भयावह घटनांची झलक पाहायला मिळते.

हे सुद्धा वाचा

Cristiano Ronaldo : क्लब क्रिकेटमध्ये रोनाल्डोचा जलवा सुरूच! रचलाय नवा विश्वविक्रम

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींच्या ‘स्वराज्य’ला उदंड प्रतिसाद; राज्यात अनेक ठिकाणी शाखांची स्थापना सुरू

Eknath Shinde : शिंदे गटाने सुचवलेले 3 पर्याय समोर! वाचा कोणकोणत्या गोष्टींचा केलाय समावेश

ट्रेलरच्या शेवटी, शीबा चढ्ढा आणि कतरिना यांच्यात एक मजेदार संभाषण आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल. शीबाही चित्रपटात भूत बनली आहे. याशिवाय निधी बिश्त, मनु ऋषी चढ्ढा यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी याची निर्मिती केली आहे.

हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी सोमवारी (10 ऑक्टोबर) ‘फोन भूत’चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.

लग्नानंतरचा पहिला चित्रपट
कतरिना कैफच्या लग्नानंतरचा हा पहिलाच चित्रपट आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने विकीशी लग्न केले. या चित्रपटात ती भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. वर्क फ्रंटवर, कतरिना पुढील ‘टायगर-३’, ‘जी ले जरा’ आणि ‘मेरी ख्रिसमस’मध्ये विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी