राजकीय

Ajit Pawar : दसरा मेळाव्यात भाषणे कुणाची लांबली हे तुम्हाला माहितीये, अजित पवारांचा मिश्किल टोला

यंदाचा दसरा मेळावा मोठ्या जोशात, जल्लोषात पार पडला असला तरीही यावर्षीपासून शिवसेनेचे दोन मेळावे असा एक पायंडाच काल पडल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे शिवाजी पार्कवर मोठ्या जनसागरात ठाकरे गटाकडून मेळाव्याचा उत्सव साजरा करण्यात आला तर दुसरीकडे बीकेसी मैदानात शिंदे गटाचा सुद्धा मेळावा पार पडला. या दोन्ही मेळाव्यात प्रमुख आकर्षणबिंदू ठरलेल्या प्रमुख भाषणांवर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी कालच्या भाषणावर मत व्यक्त करत या मेळाव्यात काही काहींची भाषणे तर फारच लांबली ती कुणाची लांबली हे तुम्हाला माहिती आहे असे म्हणून अप्रत्यक्षरीत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी नेते अजित हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच या दौऱ्यास सुरूवात केली असून विविध विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार यांनी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंघाने माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी कालच्या बहुचर्चित दोन्ही दसरा मेळाव्याविषयी महत्त्वपूर्ण भाष्य केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शिवसेनेची स्थापना झाल्यापासून दसरा मेळाव्यात (Dasara Melava) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी लोक यायचे. पण कालच्या दसरा मेळाव्यात काहींची भाषण नको इतकी लांबली. आता कुणाची लांबली ते तुम्हालाही माहिती आहे, असे म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंवर फटकारले आहे.

अजित पवार पुढे म्हणतात, शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन मेळावे झाले. सगळ्यांना कुतूहल होतं. दोघांनी काल भाषणं केली, दोघांचीही भाषणं ऐकली. दोघांनी एकमेकांवर टीका केली. पण मी कोणाच्याही भाषणावर टीका करणार नाही. पण कोणाच्या पाठीमागे राहायचं हे याचा निर्णय आता लोकांना, मतदारांना घ्यायचा आहे असे म्हणून त्यांनी सामान्य मतदाराचा निर्णय आता महत्त्वाचा असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा..

Mumbai News : उद्धवाने शिवतीर्थ गाजवलं पण ठाकरे घराणं मात्र फुटलं, ठाकरे कुटुंबाचे 3 शिलेदार शिंदेंच्या मंचावर

Breaking News : दिल्ली कॅपिटल्समधील युवा खेळाडूला पोलिसांकडून अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

INDvsSA ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

कोरोडो रुपये खर्च करून लोक जमवले, बस भरून दसरा मेळाव्याला आल्या यामदअये प्रवाशांचे प्रचंड हाल झाले मुख्यमंत्री यांच्या गटाने दहा कोटी रुपये भरुन बस नेल्या होत्या. त्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे हाल झाले. अशा गोष्टी करता कामा नये. तुम्हाला जसा दसरा मेळावा महत्त्वाचा होता पण जनतेचा देखील विचार करणं गरजेचं होतं असे म्हणून पवारांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आणि या कार्यक्रमानिमित्त फरफट झालेल्या जनसामान्यांचे कसे हाल झाले याचे चित्रणच अजित पवार यांनी यावेळी केले.

तुमच्या नावापुढे मुख्यमंत्रीपद लागलं यातच तुमची खुशी होती. पण शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा हे तुम्हाला दिसलं नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले. त्यावर विचारलं असता अजित म्हणाले की, ते मंत्रिमंडळात होते. ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. तेव्हा झेंडा शिवसेनेचा आहे पण अजेंडा राष्ट्रवादीचा आहे असं मी ऐकलंच नाही. 1999 पासून आपल्याला विविध पक्षासोबत सरकार चालवायचा अनुभव आहे. सगळे निर्णय एकत्र घेतले. कालची वक्तव्ये ही राजकीय स्वरुपाची होती, असे पवार यांनी एकनाथ शिंदे यांनी सणसणीत चपराक लगावत त्यांच्या कालच्या मेळाव्यावरून टीका केली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

1 hour ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

2 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

3 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

3 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

4 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

5 hours ago