31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाINDvsSA ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता! पाहा दोन्ही संघांची संभाव्य...

INDvsSA ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

लखनौमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या वनडे सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो.

गुरुवारी (6 ऑक्टोबर) खेळल्या जाणार्‍या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याची मजा पावसामुळे खराब होऊ शकते कारण बुधवारी लखनौमध्ये पावसाने सामन्याच्या एक दिवस आधी दणका दिला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, लखनौमध्ये सामन्याच्या दिवशी म्हणजेच 6 ऑक्टोबर रोजी दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या वनडे सामन्यावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बुधवारी राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या पूर्व भागात बहुतांश ठिकाणी तर पश्चिम भागात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामन्यादरम्यान पाऊस न पडल्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे एकना स्टेडियमच्या व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. स्टेडियमचे मालक उदय सिन्हा यांनी सांगितले की, एकना स्टेडियमची ड्रेनेज सिस्टीम अत्याधुनिक असून ते खेळण्यायोग्य बनवण्यासाठी अवघ्या 30 मिनिटांत पावसाचे पाणी मैदानातून बाहेर काढले जाऊ शकते. एकना स्टेडियमवर प्रथमच भारतीय पुरुष क्रिकेट संघ एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वी भारताने येथे वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध टी20 सामने खेळले आहेत.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा वार! ठाकरे सरकारचा निर्णय बदलत महाराष्ट्र पोलिसांना दिला आधार

Elon Musk : मस्क पुन्हा ट्विटर खरेदी करण्याच्या विचारात! महत्त्वाची अपडेट आली समोर

PM Modi : दसऱ्याच्या दिवशी मोदींच्या हस्ते एम्सचे उद्घाटन; शुभमुहूर्तावर अनेक प्रकल्पांची करणार पायाभरणी

भारताच्या पर्यायी खेळाडूंसमोर स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हान आहे
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे पर्यायी खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपला दावा मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन सारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत, भारतीय निवडकर्त्यांनी एक नवीन संघ निवडला ज्यामध्ये मुकेश कुमार आणि रजत पाटीदार सारख्या नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. या संघात टी20 विश्वचषकातील काही राखीव खेळाडूंचाही समावेश आहे.

राहुल त्रिपाठी किंवा पाटीदार पदार्पण करू शकतात
टी20 विश्वचषक संघासाठी राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि लेगस्पिनर रवी बिश्नोई यांचाही या वनडे मालिकेतील संघात समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये मर्यादित संधी मिळवून प्रभावित करणारा सलामीवीर शुभमन गिल या मालिकेत धवनसोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. यासह राहुल त्रिपाठी किंवा पाटीदार यांना वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, रवी बिश्नोई, आवेश खान.

दक्षिण आफ्रिकेसाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन: जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, ऍनरिक नॉर्किया.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी