31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeराजकीयMumbai News : उद्धवाने शिवतीर्थ गाजवलं पण ठाकरे घराणं मात्र फुटलं, ठाकरे...

Mumbai News : उद्धवाने शिवतीर्थ गाजवलं पण ठाकरे घराणं मात्र फुटलं, ठाकरे कुटुंबाचे 3 शिलेदार शिंदेंच्या मंचावर

एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बीकेसीच्या मैदानावरील दसरा मेळावा, त्यासाठी जमलेली गर्दी आणि शिंदेंचे भाषण हे सुद्धा एका अर्थाने चर्चेचा विषय ठरले. दरम्यान या संपुर्ण गदारोळात एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी ठाकरे घराण्यातील सदस्यांची उपस्थितीने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रचंड जनसागरात ओथंबून गेलेला शिवसेनेचा दसरा मेळावा राज्यात कालपासून सर्वदूर एकच चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या ठाकरी शैलीने नेहमीच मैदान गाजवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सुद्धा शिवाजी पार्क वर पुन्हा एकदा सिंहगर्जना करीत उपस्थित सैनिकांना नमन करत विरोधकांना शब्दांच्या फटकाऱ्यांनी धू धू धुतले आहे. दरम्यान काल एकीकडे उद्धव ठाकरेंची सभा प्रेक्षणीय ठरत होती, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आयोजित केलेला बीकेसीच्या मैदानावरील दसरा मेळावा, त्यासाठी जमवलेली गर्दी आणि शिंदेंचे भाषण हे सुद्धा एका अर्थाने चर्चेचा विषय ठरले. दरम्यान या संपुर्ण गदारोळात एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी ठाकरे घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

स्वतःस शिवसेना म्हणून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा काल उद्धव ठाकरेंप्रमाणे मुंबईतील बीकेसीच्या मोठ्या मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. ‘सबसे आगे कौन’ या त्वेषाने पेटलेले ठाकरे आणि शिंदे गट काल आपापल्या शैलीने एकमेकांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी पार्क येथे प्रचंंड लोटलेला जनसागर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असला तरीही सगळ्यात जास्त चर्चा शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी उपस्थित ठाकरे कुटुंबियांची झाली. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे, जयदेव ठाकरे यांच्या घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनी शिंदे गटाच्या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती दर्शवली.

हे सुद्धा वाचा..

Ranbir Alia : होणाऱ्या मुलासाठी अभिनेता रणबीर कपूरने घेतलाय महत्त्वाचा निर्णय; स्वत:च करिअर लावलंय दावणीला

INDvsSA ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा वार! ठाकरे सरकारचा निर्णय बदलत महाराष्ट्र पोलिसांना दिला आधार

दरम्यान, शिवसेनेत मोठी फूट पडली त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्याऐवजी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्यात धन्यता मानली, त्यामुळे त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आलेली होती, परंतु या मेळाव्यासाठी जयदेव ठाकरेंची उपस्थिती निश्चितच अनेकांसाठी आश्चर्यजनक होती. उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यातील दुरावलेले नातेसंबंध जगजाहीर आहेत मात्र उद्धव ठाकरेंना सपशेल विरोध दर्शवत थेट एकनाथ शिंदे यांना पाठींबा दर्शवत त्यांच्यासोबत उभं राहणं म्हणजे ठाकरे घराण्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी ठाकरे परिवारासोबतच आनंद दिघे यांच्या भगिनीने सुद्धा उपस्थिती दर्शवली होती.

पहिल्यांदाच जाहीरपणे एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे पाठिंबा दर्शवत जयदेव ठाकरे म्हणाले, एकनाथ माझा आवडीचा.. आता ते मुख्यमंत्री झालेत… म्हणून एकनाथराव म्हणतो, गेल्या काही दिवसात मला बरेच फोन येत होते, की तुम्ही शिंदे गटात गेलात का? पण हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही, असं जयदेव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. एकनाथ शिंदेंच्या दोन चार भूमिका मला आवडल्या. धडाडीचा माणूस आपल्याला हवाय, त्याच्या प्रेमासाठी आलोय असे म्हणून जयदेव यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

जयदेव ठाकरे पुढे म्हणाले, आपला इतिहास आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ, त्यांना जवळच्यांनी संपवलं. पण यांना (एकनाथ शिंदे) एकटं पाडू नका, एकटा नाथ होऊ देऊ नका, एकनाथ राहू द्या, तुम्हाला विनंती आहे, अशी भावनिक साद जयदेव ठाकरेंनी घातली. हे सगळं बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या असे म्हणून शिंदे गटाच्या बाजूने उभं राहण्यासाठी त्यांनी जनतेला कळकळीने साद घातली.

त्यावेळी स्मिता ठाकरे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत म्हटले की, एकनाथ शिंदेंच्या भाषणानंतर आणखी काही जण त्यांना साथ देतील, अशी आशा आहे. जुने शिवसैनिक इथे हजर आहेत. जनतेच्या समस्या आणि गाऱ्हाणी ऐकून घेण्याची एकनाथ शिंदे यांची जी पद्धत आहे, त्यामुळेच लोक आकृष्ट होऊन साथ देतात असे म्हणून स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचे यावेळी कौतुक केले.

वैचारीत वादविवाद, सत्तालालसा आणि असंतोष यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आणि अवघ्या राज्यातील राजकारणच ढवळून निघाले. दिवसेंदिवस वादविवाद वाढत असले तरीही शिवसेनेचा खरा शिलेदार कोण हे काल राज्यातील जनतेने शिवाजी पार्कवर प्रचंड प्रमाणात एकत्र येत सिद्ध केले असले तरीही अंतर्गत कुरबुरी काही संपण्याचे चिन्ह दिसत नाहीत त्यामुळे याला लवकरच विराम लागणार की हा वाद आणखी विकोपास जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे घराणे सुद्धा फुटले आहे त्यामुळे परिस्थिती आणखी वेगळी पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी