31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाBreaking News : दिल्ली कॅपिटल्समधील युवा खेळाडूला पोलिसांकडून अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा...

Breaking News : दिल्ली कॅपिटल्समधील युवा खेळाडूला पोलिसांकडून अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछाने याला अटक करण्यात आली आहे.

भारतात सुरू झालेल्या इंडियन प्रिमिअर लीगमुळे अनेक युवा खेळाडूंची कारकिर्द बहरली आहे. अनेकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन नाव कमावलं. ज्याच्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते त्यांना ओळखू लागले. असाच एक खेळाडू म्हणजे संदीप लामिछाने. नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएल खेळलेला क्रिकेटपटू संदीप लामिछानेच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछाने याला अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, संदीपला गुरुवारी (6 ऑक्टोबर) सकाळी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी अलपवयीन मुलीने संदीपवर बलात्काराचा आरोप केला होता.

खरंतर नेपाळी क्रिकेटपटू संदीप लामिछाने याच्यावर काठमांडूमधील एका हॉटेलच्या खोलीत 17 वर्षीय तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. गौशाळा महानगर पोलीस सर्कलमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये किशोरवयीन मुलीने आरोप केला आहे की, 22 वर्षीय लामिछानेने ऑगस्टमध्ये हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. असा आरोप मुलीकडून करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या विरोधातील तक्रार पोलिसांकडे दाखल झाली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याच्यावर अटकेचा टांगती तलवार लटकलेली होती. आता अखेर त्याला अटक करण्यात आली असून पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Ranbir Alia : होणाऱ्या मुलासाठी अभिनेता रणबीर कपूरने घेतलाय महत्त्वाचा निर्णय; स्वत:च करिअर लावलंय दावणीला

INDvsSA ODI : पहिल्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता! पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

Eknath Shinde : दसरा मेळाव्यापूर्वीच एकनाथ शिंदेंचा वार! ठाकरे सरकारचा निर्णय बदलत महाराष्ट्र पोलिसांना दिला आधार

गोशाळा पोलीस वर्तुळात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, संदीप लामिछाने याने 21 ऑगस्ट रोजी मुलीला काठमांडू आणि भक्तपूर येथे विविध ठिकाणी नेले. त्याच रात्री काठमांडूतील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. संदीप लामिछाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू आहे. त्याने 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीसाठी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने अनेक सामन्यात लाक्षणिय प्रदर्शन केले. त्याला त्याच्या अनुभवात असलेल्या कमतरतेमुळे जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आयपीएलमुळे संदीपला जगभरात एक विशेष ओळख मिळाली हे मात्र नाकारता येणार नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी