राजकीय

‘पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?’

टीम लय भारी

धुळे : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला. गोंटे यांनी आपल्या भाषणात  राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावर अनिल गोटे यांनी आरोप करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?,असे अनिल गोटे म्हणाले.(Anil Gote controversial statement at ahilyabai holkar jayanti ahmednagar)

‘मला काही कुणाच्या भावना दुखवाच्या नव्हत्या’

पुण्यश्लोक माता अहिल्यादेविंच्या 297 व्या जयंती कार्यक्रमात महाराण्या व राजमातांच्या संदर्भात माझ्या भावना व्यक्त केल्या. मला काही कुणाच्या भावना दुखवाच्या नव्हत्या. नाहीत. मी कुणाचा नामोल्लेख केला नव्हता. कुणाचा नामोल्लेख करणार नाही. देशातील सर्व लहान मोठ्या संस्थानिकांच्या अथवा दिवाळखोरीच्या जवळपास पोहोचलेल्या कथीत महिलांचा उल्लेख महाराणी किंवा राजमाता असाच केला जातो. अर्थात पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी त्यांच्यातील एक नाहीतच ! मग पुण्यश्लोक मातेचा उल्लेख महाराणी अथवा राजमाता करु नका असे सुचविले तर एवढ्या मिरच्या लागायचे कारण काय ?, असा सवाल अनिल गोटे यांनी आरोप करणाऱ्यांना विचारला आहे.

‘मी स्वतः शिवतीर्थाची उभारणी केली आहे’

मला कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगप्रवर्तक कार्याबद्दल शिकविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही पाहिली नसतील एवढी एकशे त्रेपन्न पुस्तके मी अभ्यासली आहेत. राजमाता जिजाऊंच्या अनन्यसाधारण संस्कारामुळेच छत्रपती घडले. या सर्व पार्श्वभूमीचा अभ्यास करूनच धुळे शहरात मी स्वतः शिवतीर्थाची उभारणी केली आहे. शिवतीर्थावर राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याची व आई तुळजाभवानी मंदिराची उभारणी केली आहे. राजमाता जिजाऊ व आई तुळजाभवानी मातेशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची पुर्तता होवूच शकत नाही. शिवतीर्थाची उभारणी 1995 मधे केली, असे अनिल गोटे म्हणाले.

‘शिवतीर्थाच्या निर्मिती मागील कारण समजून घेणे महत्त्वाचे’

शिवतीर्थाच्या निर्मिती मागील कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. कैक. रामराव सिताराम पाटील धुळे जिल्ह्यातील काॅग्रेसचे एक प्रस्त होते. आमदार निवासात फोरास रोडच्या बाया आणून कॅबरे डान्स केल्याप्रकरणी त्यांची मध्यरात्री आमदार निवासापासूनची वरात आझाद मैदान पोलीस स्टेशनला पोहोचली होती. तहसीलदारांना जोडामारणे अशी अनेक किरकोळ प्रकारचे मी टाळतो. या महान व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी सलग वीस वर्षे शालेय विध्यार्यापासून तर रामराव सिताराम पाटील चेअरमन असलेल्या जिल्हा बँकेत कर्ज मागणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्व वर्गीतील लोकांकडून वर्गणी खंडणी वसूल केली होती. ज्यांनी विद्यार्थी असताना वर्गणी दिली. त्यांची लग्ने झाली. त्यांना मुलेही झाली. मुलांनीही वर्गणी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कॅलेंडर छापले. किती त्याचा हिशोब नाही.तेही आठवले. अक्षरशः लक्षावधी रुपये गोळा करून आपल्या ऐय्याशीत उडवले.पण महाराजांच्या पुतळ्याचे नामोनिशाण नाही, असे अनिल गोटे म्हणाले.

‘फक्त सहाच महिन्यात भव्य शिवतीर्थाची निर्मिती केली’

धुळेकर जनतेने सर्व संयमाने आणि शांततेने सहन केले.1995 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मला 1800 मते मिळाली. पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विषयावर खूप झोड उठवली. रामराव पाटीलांनी मला आव्हान दिले. मी स्विकारले. फक्त सहाच महिन्यात भव्य शिवतीर्थाची निर्मिती केली. शहरातील लहान लहान कार्यकर्त्यांनी खूप मोठ्ठे काम केले.

 

‘कुठल्याही फालतू प्रयत्नांना मी केंसाइतकी किंमत देत नाही’

आज सकाळपासून मला त्रेचाळीस सुपारी बहाध्दरांचे फोन आले. त्यांच्या वाक्य रचनेवरून मला राग येईल संतापात मी काही वेडेवाकडे बोलेन .! शिवीगाळ करेन .मग पेंड चॅनलवर संभाषणाची टेप वाजवायची. त्यातून मला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत बोललो म्हणून त्यांना आमदार रोहीत पवारांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते म्हणून त्यांची मिडीया ट्रायल करण्याचा हा डाव पहिल्या दोन तीनफोन मधील वाक्य रचनेवरून लक्षात आले. एवढेच सांगतो की असल्या कुठल्याही फालतू प्रयत्नांना मी केंसाइतकी किंमत देत नाही. शिडी लावून उंटाच्या ##डीचा मुका घेण्याचा प्रयत्न करु नये. आपल्या पार्श्वभागाचा मुका घेवू द्यायचा की नाही हे उंटावर अवलंबून आहे.तुमच थोबाड उंटाच्या ##डीपर्यंत पोहचताच उंट पुढे सरकला तर थोबाड फुटेल हे आणि शोरूम दाखवण्या लायक रहाणार नाही, असे अनिल गोटे म्हणाले.


हे सुद्धा वाचा :

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

अनिल गोटे यांचा भाजपला ‘वात्सल्य’युक्त टोला !

Pratiksha Pawar

View Comments

Recent Posts

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

23 mins ago

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक…

53 mins ago

‘काँग्रेस कसाबची बाजू घेतेय, हा शहिदांचा अपमान’, PM मोदींचा हल्लाबोल

काँग्रेसवाले मिळून दहशतवादी कसाबची बाजू घेतायत. काँग्रेसच्या काळात विदेश राज्यमंत्री राहिले आणि कुटुंबातील जवळच्यानेही कसाबला…

12 hours ago

शांतिगिरी महाराज यांना माघारीसाठी दोन वेळा संपर्क : मुख्यमंत्री शिंदे

राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान नेहमी मोठे असते . त्यामुळे मी स्वतः महंत शांतिगिरी महाराज (Shantigiri…

13 hours ago

तुम्ही तर महागद्दार निघाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; ठाकरेंवर हल्लाबोल

विजय करंजकर यांच्या भावना योग्य आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी आदल्या दिवासापर्यंत त्यांच नाव चर्चेत होत. तसंच…

13 hours ago

अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे शंभर शोज ‘हाऊसफुल्ल’

'गीतरामायणा'ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा…

13 hours ago