30 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयअर्णव गोस्वामीने रात्र घालविली शाळेच्या ‘कोविड’ सेंटरमध्ये

अर्णव गोस्वामीने रात्र घालविली शाळेच्या ‘कोविड’ सेंटरमध्ये

टीम लय भारी

अलिबाग :  पोलिसांनी अटक केल्यानंतर पत्रकार अर्णव गोस्वामी याला कालची रात्र एका शाळेत घालवावी लागली आहे. कैद्यांसाठी तयार केलेल्या ‘कोविड’ सेंटरमध्ये गोस्वामीला मुक्काम करावा लागला ( Arnab Goswami spent night at school ).

अर्णव गोस्वामी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. काल रात्री उशिरा स्थानिक न्यायालयाने गोस्वामीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. गोस्वामीला पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी पक्षाने जोरदार युक्तीवाद केला होता. परंतु न्यायालयाने तो अमान्य केल्यामुळे अर्णवची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली ( Court remanded Arnab Goswami in judicial custody for 14 days ).

हे सुद्धा वाचा

अर्णब गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मराठी महिलेवर अन्याय झाला तरी चालेल, पण अर्णव गोस्वामींना अटक करू नका : शिवसेनेचा भाजपला टोला

अर्णब गोस्वामींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गोस्वामी याच्या बरोबर फिरोज शेख व नितेश सारडा हे अन्य दोन आरोपीही याच शाळेच्या ‘कोविड’ सेंटरमध्ये मुक्कामास होते. संबंधित शाळा ही अलिबाग नगर परिषदेची आहे. ‘कोरोना’ महामारीमध्ये शाळेचे रूपांतर कैद्यांच्या ‘कोविड’ सेंटरमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे अन्य कैद्यांप्रमाणे अर्णव गोस्वामीला सुद्धा याच कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

जामिनासाठी प्रयत्न

अर्णव गोस्वामीला न्यायालयीन कोठडी दिलेली असल्याने त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गोस्वामी याच्याकडून आज अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयातही गोस्वामी यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी