32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयपराभवाची कारणे शोधण्यासाठी आशीष शेलार विदर्भ दौ-यावर

पराभवाची कारणे शोधण्यासाठी आशीष शेलार विदर्भ दौ-यावर

टीम लय भारी

नागपूर (प्रतिनिधी) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात पराभव का झाला? या मागील कारण शोधण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार कामाला लागले आहेत. शेलार यांना भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार (Ashish Shelar) तीन दिवस विदर्भ दौ-यावर आहेत. ते नागपुरात दाखल झाले. त्यांनी काल सकाळपासून भाजपच्या जवळपास 80 पदाधिका-यांशी संवाद साधला. नागपूरमधील कामे आटोपल्यानंतर त्यांनी सोमवारी अमरावती गाठले.

नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भातील नागपूर आणि अमरावती दोन्ही जागांवर अपयश आलं. या पराभवामागील सत्य शोधण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आशिष शेलार सध्या विदर्भ दौ-यावर आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत पुणे आणि मराठवाड्यातही पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींकडून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे.

आशिष शेलार, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणं शोधतील. त्यानंतर औरंगाबाद, विदर्भ, पुण्याच्या पराभावाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारलं होतं. दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता, मात्र पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी