31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूकीत सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूकीत सत्यजित कदम यांना भाजपाची उमेदवारी

टीम लय भारी

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद असून, त्यामध्ये त्यांनी घोषणा केली.

सत्यजित कदम हे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, शिवाजीराव कदम यांचे चिरंजीव आहेत.भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. प्रदेशाकडून निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत.

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात जनतेचा आदेश मिळवून पोटनिवडणूक जिंकेल, असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी