राजकीय

Cabinet Minister Passes Away : कॅबिनेट मंत्र्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन

राजकीय वर्तुळाला हादरा देणारी बातमी समोर आली आहे. कॅबिनेट मंत्र्याचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कर्नाटकचे अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी निधन झाले. बंगळूरू येथे डॉलर्स कॉलनी येथे राहत असलेले कत्ती यांना बाथरुममध्ये असताना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि ते तिथेच कोसळले. उमेश कत्ती कोसळल्यानंतर त्यांना तात्काळ एम.एस.रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कत्ती मृत्यूसमयी 61 वर्षांचे होते, त्यांच्या अचानक जाण्याने कर्नाटक सरकारमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आताच्या कर्नाटक सरकारमध्ये उमेश कत्ती अन्न नागरी पुरवठा आणि वनमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी या आधी नऊ वेळा विधानसभा निवडणूक होती आणि आठ वेळा ते निवडून आले होते. जनमाणसात चांगल्याप्रकारे त्यांची ओळख असल्याने दरवेळी लोकांची त्यांनाच पसंती होती. कत्ती यांनी त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी केली होती ज्याची प्रचंड चर्चा सुद्धा झाली. उमेश कत्ती हे जनता दलाच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाहीरपणे प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा…

Maharashtra Politics : ‘भाजपचे नेते 100 टक्के खोटे बोलतात, मग अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे…’

Rishi Sunak : ब्रिटनच्या निवडणुकीत ऋषी सुनक हरले

Ganeshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

उमेश कत्ती यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये नरेंद्र मोदी म्हणतात, उमेश कत्ती हे एक अनुभवी नेते होते. ज्यांनी कर्नाटकच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबियांसोबत आहोत, ओम शांती, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.  पंतप्रधान मोदी यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, पियुष गोयल यांच्यासारख्या भाडपच्या अनेक बड्या नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, उमेश कत्ती यांच्या निधनानंतर बेळगाव जिल्ह्यातील शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कत्ती यांचे पार्थिव सकाळी बेळगावला आणण्यात येणार असून नंतर त्यांच्या बेल्लद या मूळ गावी नेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना…

6 hours ago

हिरावाडी रोडवर मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या पाईपांना भीषण आग

हिरावाडी रोडवरील (Hirawadi Road) नंदनी अगरबत्ती पाठीमागील परिसरात मोकळ्या भूखंडात ठेवलेल्या शेती उपयोगी पाईपांना (pipes)…

6 hours ago

ई-कुबेर प्रणालीमुळे दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांमध्ये असंतोष

नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…

7 hours ago

पीके करपल्यावर पाण्याचे आवर्तन; शेतकऱ्यांचा संताप

एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…

7 hours ago

‘खरे शिवसेना प्रमुख असाल तर…’ रत्नागिरीतून अमित शाहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…

7 hours ago

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

17 hours ago