राजकीय

Maharashtra Politics : ‘भाजपचे नेते 100 टक्के खोटे बोलतात, मग अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे…’

सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळातील घडामोडी वेगाने व्हायला लागल्या आहेत. शिवसेनेतच मोठी फूट पडल्यानंतर भाजपला आयचतेच कुरण मिळाल्याने राजकारणाला आता वेगळेच वळण लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई भेटीनंतर या कुरबूरी पुन्हा वाढल्या असून विरोधी गटाकडून सुद्धा नाराजीचा सूर आळवण्यात येत आहे. या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी नेते अनिल गोटे यांंनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भाजप नेत्यांना 100 टक्के खोटे बोलण्याची सवय आहे. अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे? असा सवालच त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी नेते अनिल गोटे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत भाजपवर जोरदार टीका केली आहे. ट्विटमध्ये अनिल गोटे लिहितात, अमित शाह यांनी मुंबई भेटीतून शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या विजयाचे दरवाजे खुले करून देण्याचे काम केले आहे. गुप्त बैठकीत काय ठरले याचा खुलासा त्यांनी तीन वर्षानंतर केला, मराठी माणसांबद्दल त्यांच्या मनातील गरळ ओकून मोकळे झाले. वाचकांनो थोडा डोक्याला त्रास द्या. त्यावेळी उद्धव ठाकरे महिनाभर सातत्याने प्रेससमोर सांगत होते की, अमित शाहांची व आपली मातोश्रीवर बैठक झाली. त्या बैठकीत काय ठरले त्याची अंमलबजावणी करा, ते भाजपला आवाहन करीत होते असे म्हणून त्यांनी अमित शाह यांच्या भूमिकेवरच यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा…

Ganeshotsav 2022 : अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा श्रीगणपतीबाप्पांचे दर्शन

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात उभी राहतेय लोकचळवळ!

BJP : भाजपच्या ‘मिशन लोटस’ विरोधात ‘हे’ नेते उतरले रणांगणात

पुढे अनिल गोटे लिहितात, तेव्हा मात्र ‘असे काही ठरले नव्हते’ असे चार – पाच शब्द सुद्धा तोंडातून काढले नाहीत. आता अचानकपणे त्यांनी मातोश्रीवर काय ठरले होते, हे सुद्धा सांगितले नाही. भाजप नेत्यांना 100 टक्के खोटे बोलण्याची सवय आहे. अमित शाह 50 टक्केच खोटे का बोलले बरे? असा मिश्कील टोला गोटे यांनी लगावला आहे. दरवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे अनिल गोटे यांनी यावेळी सुद्धा अमित शहा यांच्या भूमिकेवर टीका करीत भाजपला चांगलेच फटकारले आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा प्रचंड चर्चेचा ठरला, यावेळी त्यांनी भाजपच्या संघटन मजबूतीकरणासोबतच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांनामहत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यामुळे विरोधी गटातील नेत्यांमध्ये चांगलीच खलबलं सुरू झाली. अनेक वर्षे शिवसेनेचाच भगवा महापालिकेवर फडकत होता, परंतु शिवसेनेतच दोन गट पडल्याने यंदा नेमकी बाजी कोण मारणार असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. शिवसेनेची दुर्देशा झालेली असताना त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो म्हणून अमित शहांपासून सगळेच मोठे भाजप नेते जोरदार कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात नेमकं काय घडणार कोणत्या पक्षाचे स्थान कायम राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

4 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

4 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

5 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

5 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

5 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

7 hours ago