30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीय'स्मशान आणि कब्रस्तान'; राहुल गांधीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

‘स्मशान आणि कब्रस्तान’; राहुल गांधीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा!

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे. मागील तीन दिवसांपासून तर नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त आढळत आहे. इतकेच नव्हे तर १५ दिवसांत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या तिपटीने वाढली आहे. देशात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे स्मशानात मृतदेहांवर अंतिमसंस्कार करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनासंदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. बंगाल निवडणूक प्रचारादरम्यानही राहुल गांधींनी कोरोनाच्या तयारीबाबत सरकारला प्रश्न विचारला.

राहुल गांधींनी आज ट्विट करुन लिहिले की, ‘स्मशान आणि कब्रस्तान दोन्ही… जे म्हटलं ते करुन दाखवलं’, आहे. त्याचबरोबर #ModiMadeDisaster हा हॅशटॅगही वापरला आहे. काही दिवसांपूर्वी बंगाल निवडणूक प्रचारादरम्यान निवडणूक सभेला संबोधित करत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टोला लगावला होता.

बंगालमधील निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळातही गरीब मजुरांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांच्या उद्योगपतींनाच मदत केली.

यापूर्वी, राहुल गांधींनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीचा आरोप केला होता की, लसीचा उत्सव करण्याचे नाटक आहे ते देखील आवश्यक वैद्यकीय सुविधांच्या अभावाखाली होते. राहुल गांधींनी ट्वीट करून लिहिले आहे की, येथे चाचणी नाही, रुग्णालयात पलंग नाही, व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजन नाही, लस नाही तर फक्त उत्सव करण्याच नाटक आहे. पीएम केअर?

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी