31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयनाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे

टीम लय भारी

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला १२ तास शिल्लक असताना निवडणुकीतून माघार घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसची कमालीची नामुष्की झाली. दुसरीकडे पक्षाच्या या कृतीमुळे भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आलेले अधिकृत उमेदवार डॉ. रवींद्र भोयर हे तोंडघशी पडले. त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी देणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजकारणातील विश्वासार्हतेलाही तडे गेले आहे. त्यावर आता भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.( Chandrasekhar Bavankule demands resign of Nana Patole)

“नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. नाना पटोले हतबल झाले आहेत आणि काँग्रेसला न्याय देऊ शकणारे नाहीत. दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र काँग्रेसला आपला निर्णय बदलावा लागला हे अत्यंत लाजिरवाणे चित्र आहे. काँग्रेसच्याच दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोलेंनी उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पक्षाच्या मंत्र्यांवरच त्यांचे नियंत्रण नाही. ही महाराष्ट्र काँग्रेसच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना आहे,” चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

आता ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही!: नाना पटोले

BJP : ‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….

“मंत्र्याच्या दबावाखाली काम करणारे असाल तर प्रदेशाध्यक्ष बनण्याच्या लायकीचे नाही आहात. १३ दिवसांच्या प्रचारानंतरही उमेदवार बदलावा लागतो यापेक्षा नामुष्की आणि शरमेची बाब कोणतीही नाही. असा हतबल प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला न्याय देऊ शकत नाही. मंत्र्यांवर कारवाई करायची की नाही हा काँग्रेसचा निर्णय आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये विदर्भात काँग्रेसची वाट लागणार आहे. यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता खचलेला आहे,” असेही बावनकुळे म्हणाले.

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

Exclusive Interview | BJP Will Cross 350 Seats in UP, No Doubt and No Challenge, Says Yogi Adityanath

“भाजपाकडे ३१८ मतांचे बहुमत आहे. त्यामुळे कुठलीही चिंता आम्हाला नाही आहे. मी निवडणुक योग्य पद्धतीने लढलो आहे त्यामुळे विजय हा १०० टक्के नक्की आहे. ३१८ मतं ही भाजपाची आहेत त्यावर जी मिळतील ती महाविकास आघाडीची फुटलेली मते असतील,” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी