राजकीय

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधारींना अनेक वेळा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे त्यांच्या रोखठोक विनोदी शैलीसाठी प्रसिध्द आहेत. आज त्यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव यावर सरकारने दिलेल्या उत्तरावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकले. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाय योजना केली याचे लेखी उत्तर सरकारने दिले, त्यात निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले. विच्छेदन केले. डास घनता काढली, असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले होते.

त्यावर पकडलेल्या डसांपैकी नर आणि मादी डास किती ? छगन भुजबळांनी असा विनोदी सवाल केला. महोदय, पकडलेल्या डासांपैकी नर आणि मादी डास किती? भुजबळांनी या विभागाने चांगले काम केले आहे असा टोमणा मारला. त्यामुळे एकच हशा पिकला. भुजबळ यांनी विचारले की एकूण किती डास पकडले. डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि मादी डास आढळले.  यात नर डास जास्त धोकादायक आहे की, मादी डास धोकादायक आहे? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? असे गंमतीशीर प्रश्न विचारले. छगन भुजबळ यांचा मागच्या आठवडयात काळी दाढी आणि पांढरी दाढीचा विषय चांगलाच गाजला होता. छगन भुजबळ हे त्यांच्या विनोदी शैलीतून सरकारला चांगलेच धारेवर धरतात. त्यामुळे वातावरणात हस्याचे फवारे नेहमीच उडतात.

हे सुद्धा वाचा

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

तसेच यावेळी उर्ध्व गोदावरी प्रकल्पावरुन देखील छगन भुजबळ यांनी प्रश्न विचारले. उर्ध्व गोदावरी प्रकल्पाचा चतुर्थ सूप्रमा मिळावा यासाठी भुजबळ गेली अनेक दिवस पाठपुरावा करत आहेत. या बाबत त्यांनी कलम 105 अन्वये लक्षवेधी उपस्थित केला. त्यांनी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पर्वेकडे वळविणाऱ्या मांजरपाडा योजनेचा समावेश उर्ध्व गोदावरी प्रकल्पात होतो. निधी अभावी काही वळण योजना आणि कालव्यांची कामे निधी अभावी अपूर्ण आहेत हे लक्षात आणून दिले

रूपाली केळस्कर

Recent Posts

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 mins ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

18 mins ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

32 mins ago

मिल्ट्री कॅम्प च्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

1 hour ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

2 hours ago

निवडणूक कामात हलगर्जीपणा करणारे नाशिकचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस आयुक्त संदीप कर्णिक

निवडणुकीच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना (Two policemen suspended) पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (…

2 hours ago