30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईSanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

या पत्राचाळ प्रकरणात सहभागी असलेले प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली परंतु प्रवीण हे नावापुरतेच या प्रकरणात सहभागी आहेत, या प्रकरणातील खरे गुन्हेगार संजय राऊत आहेत असा दावाच ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर यामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कोठडी 5 सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्यांना सुरवातीला आठ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर आज पुन्हा या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयातील विशेष पीएमएल कोर्टाकडून संजय राऊत यांंच्या कोठडीच वाढ करण्यात आली असून त्यांना 5 सप्टेंबर पर्यंत आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेची धडाडणारी तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्या अटकेने शिवसेनेचा बुरुज डळमळीत झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे. अटकेनंतर सुद्धा राऊत यांना शिवसैनिकांकडून भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे.

शिवसेनेच्या महत्त्वाच्या फळीतील लढवय्ये नेते संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने घरी धाड टाकत अटक केली होती. संजय राऊतांच्या अटकेने शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष तर भाजपच्या गोटात आनंदीआनंद पाहायला मिळत होता. दरम्यान अटकेनंतर राऊत यांना न्यायालयाकडून 22 ऑगस्ट पर्यंत आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या कोठडीची मागणी केली नाही म्हणून पुन्हा राऊत यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा…

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

Society Law : सोसायटी अविवाहित लोकांना घर भाड्यावर देण्यास मनाई करू शकते का ?

संजय राऊत का फसले ईडीच्या जाळ्यात?

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या संजय राऊत अटकेत आहेत. या प्रकरणात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत यांचा भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटचे काम पाहत होते. त्यावेळी प्रविण यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी प्राप्त झाले. हे पैसे मिळाल्यानंतर लगेचच त्यातील तब्बल 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाले. संजय राऊत यांनी अलिबाग येथे घेतलेली जमीन याच पैशांतून घेतली असल्याचे निदर्शनास आले.

या पत्राचाळ प्रकरणात सहभागी असलेले प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली परंतु ईडीच्या मते प्रवीण हे नावापुरतेच या प्रकरणात सहभागी आहेत, या प्रकरणातील खरे गुन्हेगार संजय राऊत आहेत असा दावाच ईडीकडून करण्यात येत आहे. संजय राऊत यांच्या अटकेच्या प्रकरणानंतर यामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी