राजकीय

Maharashtra Assembly Session : ‘मुख्यमंत्री घेतात नाव शिवसेनेचे आणि निर्णय राबवतात भाजपचे’

“मागच्या दीड – दोन महिन्यात असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने घेतला. अरे.. तुम्ही घेतलेले सगळे निर्णय तुमच्याकडून बदलून घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव शिवसेनेचे घेत आहेत आणि सगळे निर्णय आणि कार्यक्रम मात्र भाजपचा राबवत आहेत”, असे म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आज जोरदार हल्लाबोल केला. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आजचा पाचवा दिवस सुद्धा विरोधकांनी दणाणून सोडला आहे. राज्यात नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयावर बोलताना जाधव यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा यावेळी बुरखाच फाडला.

नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्याबाबतचे विधेयक आज पटलावर मांडण्यात आले, त्यावेळी विरोधकांनी यावर नाराजी दर्शवत हे विधेयक लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हणत जोरदार विरोध केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शाब्दिक फटकेबाजीनंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा हाच मुद्दा उपस्थित करीत शिंदे – फडणवीस सरकारला धारेवर धरले. यावेळी जाधव यांनी लोकशाही बळकट करायची असेल तर त्यांची ताकद वाढवणारे कायदे करा, कायदे निरंकुश ठेवणारे नको असे म्हणून सभागृहात मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी कळकळीची विनंती केली.

हे सुद्धा वाचा..

Chhagan Bhujbal :छगन भुजबळ यांनी डासांवरुन तानाजी सावंत यांना चांगलेच कोंडीत पकडले

Supreme Court : मुंबई महानगरपालिका निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Sanjay Raut : संजय राऊतांचा कोठडी मुक्काम वाढला

सभागृहात सादर केलेल्या नगराध्यक्ष आणि सरपंचांच्या थेट निवडीच्या विधेयकावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, या विधेयकात बऱ्यात त्रूटी आहेत, त्यामुळे हा कायदा पुन्हा एकदा तपासून घेण्यात यावा, पुन्हा एकदा कायद्याचे बरे – वाईट परिणाम काय आहेत ते समजून यामध्ये अविश्वासाचा ठराव काय आहे तो सुद्धा पडताळण्यात यावा असे यावेळी जाधव यांनी सुचवले. जाधव पुढे म्हणाले, लोकशाहीत आपण काही प्रयोग करायचे असतात, काही निर्णय घ्यायचे असतात. परंतु त्या निर्णयाचा परिणाम जनहितावर काय होतो हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे असते. लोकशाही बळकट करायची असेल तर त्यांची ताकद वाढवणारे कायदे करायला हवेत, निरंकुश ठेवणारे नाही असे म्हणून या विधेयकावर पुनर्विचार करण्याची विनंती भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

नेहमीप्रमाणे रोखठोक बोलणाऱ्या भास्कर जाधवांनी यावेळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष केले. जाधव म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाव शिवसेनेचे घेतात आणि सगळे निर्णय आणि कार्यक्रम मात्र भाजपचा राबवतात.  घेतलेल्या दीड – दोन महिन्यात असा एक निर्णय दाखवा जो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने घेतला. अरे.. तुम्ही घेतलेले सगळे निर्णय तुमच्याकडून बदलून घेण्यात येत आहेत, असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीकास्त्र सोडले आणि शिंदे गटाला चांगलेच सूनावले.

पुढे जाधव म्हणाले,  सावध राहा, कराल कारभार तर स्वाभिमानाने करा. गरज फक्त तुम्हाला नाही त्यांना सुद्धा आहे. सत्तेत त्यांना पण यायचे होते. ते पण तडफडलेत म्हणून निर्णय करायचे असतील तर निर्णय फक्त त्यांच्या हिताचे, त्यांच्या अहंकाराचे घेऊ नका अशाने काहीच चांगलं घडणार नाही. याचा पुन्हा विचार करा, असे म्हणून भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर धोक्याची घंटा बडवली आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

5 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

5 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

6 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

6 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

7 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

7 hours ago