राजकीय

‘चोर’टेगिरी आली चित्रा वाघ यांच्या अंगलट !

‘चोर’टेगिरी चित्रा वाघ यांच्या चांगलीच अंगलट आली. प्रत्येक विषयात नाक खुपसून मतप्रदर्शन करण्याचा अट्टाहास त्यांना नेहमीच अडचणीत आणत असतो. आजही तसेच झाले. उद्धव ठाकरे – अरविंद केजरीवाल भेटीवरून चित्रा वाघ यांनी ट्विट करताच नेटकऱ्यांनी त्यांना पती किशोर वाघ यांच्या लाचखोरपणाची आठवण करून दिली. ज्यांचा स्वत:चा नवरा चोर आहे,  त्या बाई आता वर तोंड करून बोलत आहे, अशा शब्दांत त्यांना युझर्सनी सुनावले.

शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी ट्विट केले.  चोर चोर मौसेरे भाई
मिल-जुलकर खाये मलाई
खुद ही करे घर की तिजोरी ख़ाली
क़हत फ़िरत हमने की थी रखवाली ।
असे ट्विट करून वाघ यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, बीएल संतोष, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांना टॅग केले.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेला ठाकरे-केजरीवाल भेटीचा फोटो. यावेळी संजय राऊत यांच्यासह @BhagwantMann, @SanjayAzadSln, @raghav_chadha, @AtishiAAP हेही उपस्थित होते.

चित्रा वाघ यांच्या ट्विटवर तूफान हल्ला चढवत नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. याशिवाय पक्ष बदलताच सोयीची आणि दुटप्पी भूमिका घेत असल्याबाबत त्यांना जाबही विचारला.

अयोध्या पौळ पाटील यांनी ट्विट केले – “चोर” शब्दावरुन आठवलं ते किशोर वाघ यांनी बातम्यांमध्ये दाखवली तितकीच लाच घेतली होती की घबाड जमा कलं होतं? अहो, स्वयंघोषित महिला नेत्या तथा लाडक्या चित्रा वाघ काकू तुमच्या घरधनी साहेबांबद्दल बोलणार का कधी? #विचित्र

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना 4 लाखांची लंच घेतांना अटक – ABP माझा बातमी

अभिजीत यांनी चित्रा वाघ यांचे पाती किशोर वाघ यांच्या अटकेच्या बातमीचा स्क्रीन शॉट शेअर करून म्हटले –
चोर मचाए शोर… चिवाचा नवरा लाचखोर

सतीश यादव म्हणतात – ज्यांचा स्वत:चा नवरा चोर आहे,  त्या बाई आता वर तोंड करून बोलत आहे. तुम्ही ज्या पक्षात आहात, ती ‘अलीबाबा चाळीस चोर’ची पार्टी आहे. #माझा_नवरा_चोर_आहे


अभय खैरनार म्हणतात, “ताई, आमचे पंतप्रधान अदानी साहेबांबद्दल काहीच का बोलत नाहीत ????”

पराग मोहिते या युझरने चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महागाईबद्दल टीका करणारा व्हिडिओ पोस्ट करून वाघ यांची पोलखोल केली आहे.


संदीप शहाणे म्हणतात, “महिला मोर्चा सांभाळा अगोदर.. ज्या-ज्या महिलांवर अन्याय झाला, ते अन्याय करणारे एक तर भाजपवासी झाले नाही, तर मिंधे झाले. त्यावर थोडा टिवटिवाट अपेक्षित आहे.
बाकी तुमच्या मिस्टरांबद्दल खूप ऐकले आहे…
चोर-चोर मिया-बिवी
मिल-जुलकर खाये मलाई
खुद ही करे जनता की तिजोरी ख़ाली
..
..
रखवाली |

अरविंद केजरीवाल – उद्धव ठाकरे भेट

रमेश सावरकर पाटील म्हणतात, “ही ती बाई बोलत आहे, तिच्या नव-याला लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते. काय वेळ आली या बाईवर!”

उत्कर्षा आनंद म्हणतात, “ताई, तुम्ही तुमच्या लाचखोर नवऱ्याच्या बेनामी संपत्तीसाठी भाजपमध्ये गेलात, त्यामुळे बलात्कारी नेत्यांना मोकळीकच दिलीत! वाह ताई वाह 👌 लाच खोर नवऱ्याकरिता बलात्कारीत राxx शेवाळे आणि संxx राxडला मदत करता आहात🤦🏼अर्रर्र  … जनाची नकोच मनाची पण लाज सोडलीत? 🤔

सत्यमेव जयते हा युझर म्हणतो, ” त्या केजरीवालचा एक गुण नाही तुमच्यात .. कशाला रखवाली, तिजोरी, मलाई करताय.. पक्के ओळखलय आम्ही दलबदलूंना…. तुम्हाला देव कधी माफ करणार नाही”

मुंबईत मातोश्री निवासस्थानी अरविंद केजरीवाल – उद्धव ठाकरे भेट

दिपक बापुराव माने-सरकार म्हणतात,
चार खोके किशोर वाघ ओके
मॅडम, किशोर वाघानी चार लाख रुपयांची लाच जनकल्याणासाठी घेतली होती काय?

सोनिया डिसूझा म्हणतात, “😂 बघा कोण बोलतंय. अहो बाई जरा बोलताना विचार करून बोला. विरोध करायचा तिथे केलाच पाहिजे; पण उगाच मालकाला खुश करायला काय पण बोलणार का? तुम्हाला देश विकायची एवढी काय घाई झालीय का. एक स्त्री असून स्त्रीवर आत्याच्यार करणाऱ्याला वाचवायला काय-काय कराल?”

हे सुद्धा वाचा : 

उद्धव ठाकरे-केजरीवाल एकसाथ; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार?

कोर्टाने ED, मोदी सरकारला झापले; नुसतेच आरोप, पुरावे शून्य!

फुकटचे बुडबुडे फोडू नका, 56 इंचाची छाती काय असते ते जावेद अख्तरांकडून शिका! ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

 

समीर पवार म्हणतात,
राठोड-शेवाळे मेरे मौसेरे भाई
मिल-जुलकर करे नारीपे अत्याचारी
पती ही भरे घुसखोरीसे घरकी तिजोरी
क़हत फ़िरत हमने की नारी रखवाली

ट्विटरवरील चित्रा वाघ यांची खरडपट्टी काढणारी संपूर्ण थ्रेड या लिंकवर क्लिक करून वाचा 

Chitra Wagh Attacked By Netizens, Uddhav Thakre Arvind Kejriwal Meet, Kishor Wagh Bribe Reminded, Chor Remark, Chitra Wagh
विक्रांत पाटील

Recent Posts

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

1 hour ago

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातपूर पोलिसांचा “युवा संवाद”

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान…

1 hour ago

तुम्ही फोन घेतला नाही,माझ्या आईचा मृत्यू झाला; मिठू जाधव यांनी सुजय विखे यांना भर सभेत सुनावले

भाजपाचे (BJP) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांची भरसभेत पंचाईत झाली. देउळगांव सिध्दी येथील…

2 hours ago

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

14 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

14 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

14 hours ago