30 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरराजकीयउद्धव ठाकरे-केजरीवाल एकसाथ; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार?

उद्धव ठाकरे-केजरीवाल एकसाथ; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार?

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शुक्रवारी (दि.२४) रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत ‘उद्धव ठाकरे शेर का बच्चा’ असे म्हणत केजरीवाल यांनी ठाकरे यांचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच कोरोना काळातील कामाचे देखील त्यांनी यावेळी कौतूक करत सध्या सर्वौच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई ठाकरे जिंकतील असेही ते म्हणाले. (Arvind Kejriwal met Uddhav Thackeray)

येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही ठाकरेंशी युती करणार का? या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, यावेळी दोन्ही पक्ष मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार का, या प्रश्नावर केजरीवाल यांनी निवडणुका लागल्या की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगितले. त्यामुळे ठाकरे-केजरीवाल एकसाथ येत आता मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार का, अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.


यावेळी देशात दंगली, व्देशाचे राजकारण काही लोक करत आहेत, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाना साधला. भाजपविरोधी पक्षानी एकत्र आले पाहिजे अशी चर्चा देखील या बैठकीत झाली. केजरीवाल यांच्यासोबत यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार संजय सिंग, खासदार राघव चढ्ढा हे देखील उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव झाले; केंद्र सरकारने दिली मंजुरी !

पाच ट्रेंड जे बदलवून टाकतील आपले ऑनलाईन जीवन

मंत्री, आमदार घेणार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद

केजरीवाल यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना अटोक्यात आणला. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर महागाई आहे. केंद्र सरकार काही उद्योगपतींच्या भल्यासाठी देशाला वेठीस धरत आहे, असे म्हणत आम्हांला एकमेकांच्या विरोधात लढायचं नाही तर सोबत मिळून काम करायचं आहे, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी