राजकीय

Congress President Election : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली? वाचा सविस्तर…

काॅंग्रेस अध्यक्षाच्या निवडणुकीबाबत सुरू असणाऱ्या चर्चांना आज अखेर विराम मिळाला आहे. आज पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीबाबत तारीख निश्चित करण्यात आली असून सदर निवडणूक 17 ऑक्टोबरला पार पडणार आहे. याबाबत 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे, तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहेत, असे खात्रीशीर सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान सीडब्लूसीचा (CWC) शिक्कामोर्तब होताच याबाबत औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचे सुद्धा म्हटले आहे. काॅंग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्ली येथे आज पार पडली. या सभेसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

आजच्या कार्यकारिणी बैठकीत रीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह अनेक नेत्यांची या बैठकीसाठी खास उपस्थिती दर्शवली होती. यावेळी नाराज आनंद शर्मा सुद्धा उपस्थित होते. शनिवारी सायंकाळी आनंद शर्मा यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती.

हे सुद्धा वाचा…

Asia Cup 2022 : भारत – पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा ‘ट्विस्ट’, भारतीय संघात मोठे बदल

Fraud Case : ‘हॅलो, हाय ब्रो…मी आदित्य ठाकरे’ तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

Noida Twin Towers : आणि… 32 मजली टाॅवर काही क्षणांत जमिनदोस्त!

दरम्यान, या बैठकीच्या वेळी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी विचारणा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यावर काय उत्तरणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबर रोजी काॅंग्रेसपक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेची सुरवात करणार आहे. सदर यात्रा 148 दिवसांची असून त्याची सांगता काश्मिरमध्ये होणार आहे. साधारण पाच महिन्यांच्या या प्रवासात 3,500 किमी आणि 12 राज्यांपेक्षा जास्त अंतर पार केले जाणार आहे.

या पदयात्रेत सोनिया गांधी, प्रियांका गांधींसारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे अनोखी अशी ही यात्रा राहुल गांधी यांना जनमाणसांमध्ये आणखी जवळ आणेल का, काॅंग्रेसची ताकद पुन्हा वाढेल का असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित करण्यात येत आहेत. दुसरीकडे काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवडणुक सुद्धा लवकरच जाहीर होईल त्यामुळे ही यात्रा राहुल गांधींना आणखी प्रबळ करेल का असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे १६ कोटीचे धनी

सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…

10 hours ago

दिंडोरी लोकसभेच्या उमेदवाराची संपत्ती पाच वर्षात दुप्पट

दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत  (wealth)…

10 hours ago

डाॅ. पवार, गाेडसेंचा विजय निशि्चत : शिंदे

४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…

10 hours ago

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…

11 hours ago

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

16 hours ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

18 hours ago