30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमुंबईFraud Case : 'हॅलो, हाय ब्रो...मी आदित्य ठाकरे' तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

Fraud Case : ‘हॅलो, हाय ब्रो…मी आदित्य ठाकरे’ तोतया व्यक्तीकडून फसवणूकीचा प्रयत्न

तोतया व्यक्तीने स्वतः आदित्य ठाकरे असल्याचे भासवत दीपेशकडे 25 हजार रुपयांची मागणी केली.दादर पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्या तोतया व्यक्तीच्या विरोधात तोतयागिरी, फसवणूक, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नाव वापरून एकास गंडा घालण्याचा धक्कादायक प्रक्रार उघडकीस आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे नाव वापरून एका तोतयाने अनेकांकडून ई-भेट कार्डांची मागणी करून अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा आणखी एक प्रकरण समोर आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कुस्तीपटूने दीपेश जांबळे याने पोलिसांत तक्रार केली असून त्याच्याकडे तोतया व्यक्तीने आर्थिक मदत मागितल्याचे म्हटले आहे. सदर संभाषण हे व्हाट्सअॅप वर झालेले असून आदित्य ठाकरेंचे नाव वापरून भामट्याने तब्बल 25 हजारांची मागणी केल्याचे म्हटले आहे.

दीपेश जांबळे या कुस्तीपटुला अचानक एक व्हाट्सअॅप मेसेज आला. व्हाट्सअॅप स्टेटसवरील डिस्प्ले पिक्चर म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवलेला दिसत असल्याचे दीपेश यांनी सांगितले. सदर घटना 23 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास घडली. यावेळी बोलताना दीपेश म्हणाला,  “हॅलो, हाय ब्रो” असा मेसेज आला, त्यावर रिप्लाय देताच “मी आदित्य ठाकरे, तू मला ओळखलं नाहीस का दीपेश? असा प्रश्न भामट्याने विचारला. मी ओळखलं, पण सरांनी मेसेज केल्यामुळे मी गोंधळलो” असे म्हणून गोंधळ्याचा आव आणत दीपेशने थाप मारली.

 हे सुद्धा वाचा..

Noida Twin Towers : आणि… 32 मजली टाॅवर काही क्षणांत जमिनदोस्त!

Ganeshotsav 2022 : ‘सत्ताधाऱ्यांचे समुद्रमंथन आणि कार्यकर्त्यांचे मरण’, आणखी एक वादग्रस्त देखावा

BMC : ऐन गणेशोत्सवाच्या काळात हजारो कामगारांच्या खात्यात शून्य पगार

दरम्यान, संभाषण सुरू असताना तोतया व्यक्तीने स्वतः आदित्य ठाकरे असल्याचे भासवत दीपेशकडे 25 हजार रुपयांची मागणी केली. खूप अडचणीत असल्यामुळे पैशांची गरज असल्याचे त्याने त्यावेळी सांगितले. जेवण होताच पैसे ट्रान्सफर करेल असे सुद्धा त्यांने सांगितले. परंतु सदर प्रकार लक्षात घेता हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे दीपेशच्या लक्षात आले आणि त्याने थेट दादर पोलीस स्टेशन गाठले.

दादर पोलिसांनी सुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत त्या तोतया व्यक्तीच्या विरोधात तोतयागिरी, फसवणूक, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी