33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयदिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभेतून माकपचे जे पी गावित घेणार माघार

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. भाजपा काही ठिकाणी कंत्राटी उमेदवार उभे करत असल्याचे राष्ट्र वादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. परंतु काहींनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत गावित यांच्याशी सबंध जोडला. गावित यांनी शरद पवार यांची जळगाव येथे भेट घेतली. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात गावितांसंदर्भाने हे विधान अजिबात नव्हते , अशा आशयाचे लेखी पत्र देत गावितांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सीपीएमचे उमेदवार जे. पी. गावित (J P Gavit) यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. भाजपा काही ठिकाणी कंत्राटी उमेदवार उभे करत असल्याचे राष्ट्र वादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. परंतु काहींनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावत गावित यांच्याशी सबंध जोडला. गावित यांनी शरद पवार यांची जळगाव येथे भेट घेतली. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या संदर्भात गावितांसंदर्भाने हे विधान अजिबात नव्हते , अशा आशयाचे लेखी पत्र देत गावितांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.(CPI(M)’s J P Gavit to withdraw from Dindori Lok Sabha seat)

या संदर्भात पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड , माजी आमदार शिरीष कोतवाल, माजी आमदार नितीन भोसले, पक्ष निरीक्षक तिलोत्तमा पाटील,ज्येष्ठ नेते गजानन शेलार , तुषार पवार आदी उपस्थित होते.

दिंडोरी लोकसभा मतदार संघात सत्ताधारी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा सामना करताना राष्ट्रवादी पवार गटाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीतील घटकपक्ष म्हणून दिंडोरी लोकसभेची जागा सीपीएमसाठीच सुटावी, अशी इच्छा माजी आमदार जे.पी. गावित यांची होती. मात्र , जागावाटपांच्या निर्णयात ही जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे गेल्यानंतरही जे.पी. गावित यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगरे यांचा अर्ज भरतेवेळी केलेले विधान सर्वच माध्यमांमध्ये विशेष चर्चिले गेले होते. त्या विधानाचा संबंध काही जणांनी गावित यांच्याशी जोडल्यानंतर गावित यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत जळगांव येथे शरद पवार यांची भेट घेत भूमिका मांडली होती. यावर शरद पवार यांनी पत्राद्वारे गावित यांच्या पक्ष व विचारांच्या निष्ठेविषयी कुठलीही शंका नसल्याचा निर्वाळा पत्रातून दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी गावित हे इंडिया आघाडीचे घटकपक्ष म्हणून निवडणूक रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीस साथ देतील, असा विश्वास पत्रकार परिषदेत सहभागी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी