राजकीय

भक्तांची चॉईस किती फडतूस; सुषमा अंधारे यांची पोस्ट चर्चेत

ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना केलेल्या मारहाण प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. मारहाण होऊनही गुन्हा दाखल का नाही, असा सवाल करून हे मुख्यमंत्री आहेत की गुंडमंत्री, असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. याचवेळी राज्याला फडतूस गृहमंत्री लाभले आहेत. कार्यकर्त्यांवर शिंदेंच्या गुंडांकडून हल्ला होऊनही ते गप्प आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी काल (दि. 3) ठाण्यात केली. दरम्यान या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप आणि शिंदे गटाकडून सडकून टीका होत आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या टीकेला ‘भक्तांची चॉईस किती फडतूस’ असं म्हणतं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

युवतीसेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि इतर पक्षनेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, छत्रपती शिवरायांच्या बद्दल लाड, लोढा कोश्यारी यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी असभ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल कोश्यारी यांनी अश्लाघ्य भाषा वापरली पण भक्त अजिबात चिडले नाहीत. परिचारक यांनी तर शहीद पत्नींच्या बद्दल अत्यंत गलिच्छ भाषा वापरली पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले इथले लाखो युवक बेरोजगार झाले पण भक्त चकार शब्दांनी बोलले नाहीत. संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेमध्ये जे असंख्य मुस्लिम बौद्ध आणि अठरापगड जातीचे विविध धर्माचे संविधानिक मूल्यांवर प्रेम करणारे नागरिक एकत्र आले त्यांचा विटाळ म्हणून विकृत मानसिकतेच्या लोकांनी सभास्थळी गोमूत्र शिंपडलं, त्या लाखो नागरिकांचा त्यांच्या जाती-धर्माचा एका अर्थाने अपमानच केला. पण तरीही भक्त अजिबात चिडले नाहीत, पण फडतूस हा शब्द जसा ही उच्चारला गेला भक्त अक्षरशः कळवळले..

सारांश : ज्यांनी महाराष्ट्र आणि हा अवघा देश घडवला त्या महापुरुषांबद्दल अवमानकारक अवहेलनात्मक शब्द उच्चारले तरीही भक्त बोलत नाही फक्त फडतूस या शब्दावर मात्र चेकाळतात याचा अर्थ भक्तांची चॉईस किती फडतूस आहे हे लक्षातच आलं असेल? सुषमा अंधारे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि राजकीय वर्तुळात या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा: 

संजय शिरसाठ विकृत आमदार : सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

सुषमा अंधारेंचा राजीनामा, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निर्णय

काहीही झाले तरी भाजपसोबत युती कधीच होणार नाही: उद्धव ठाकरे

Fadtoos bhakt, Sushma Andhare, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis is Fadtoos, Sushma Andhare, Sushma Andhare twitter post

Team Lay Bhari

Recent Posts

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

15 mins ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

40 mins ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

55 mins ago

पालिका कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने खून करून गाेदापात्रात फेकले, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न

शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटीतील एका महापालिका कर्मचाऱ्याची (NMC employee) तीक्ष्ण हत्याराने वार करून…

1 hour ago

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था…

2 hours ago

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सातपूर पोलिसांचा “युवा संवाद”

समाजात वाढत असलेले अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी सातपूर पोलिसांनी युवा संवाद (Yuva Sanvad) अभियान…

3 hours ago