मंत्रालय

“दया तोड दो दरवाजा” म्हणत शिवाजी साटम मंत्र्यांच्या दारात

मलबार हिल येथील “पर्णकुटी” या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर एक सेलीब्रिटी अचानक दाखल होताच तिथे मंत्रीमहोदयांना भेटायला आलेल्या लोकांना क्षणातच “दया तोड दो दरवाजा” हा डायलॉग आठवतो. अरे हे तर आपले “सीआयडी” फेम एसीपी प्रध्युम्न अर्थातच प्रसिद्ध कलावंत शिवाजी साटम..! त्यांना हुबेहुब नजरेसमोर बघून उपस्थित चाहते हुरळून जातात.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चित्रपट व नाट्य क्षेत्रातील मंडळीसह इतर असंख्य लोक विविध कामांसाठी भेटायला आले होते. मंत्रीमहोदयांना भेटण्याच्या प्रतीक्षेत तासनतास वाट बघून कंटाळलेल्या लोकांच्या नजरेसमोर अचानक एक व्यक्ती येताच त्यांचा मूड बदलला.

दुरचित्रवाहिनीवरील “सीआयडी” या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेले एसीपी प्रध्युमन साक्षात तिथे प्रकटले होते. त्यांना बघताच चाहत्यांच्या मनात त्यांनी वठविलेल्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका तरळून गेली. मालिकेत तपासासाठी पोहचल्यावर आपल्या सहकारी अधिकाऱ्याला “दया तोड दो, दरवाजा” असा आदेश देणारे शिवाजी साटम प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिले.

त्यामुळे मंत्र्यांना भेटून आल्यावर बंगल्याच्या आवारात प्रेक्षकांनी त्यांना गराडा घातला. साटम यांनी देखील त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधला त्यांच्यासोबत “सेल्फी” घेण्याची काही चाहत्यांची हौस भागविली. मंत्र्यांना भेटायला आले असता आपल्या, आवडीच्या कलावंताला जवळून बघण्याचा आनंद मिळाल्याने चाहते मनोमन सुखावले.

हे सुद्धा वाचा :

अनुप जलोटा मंत्र्यांच्या बंगल्यावर अवतरतात तेव्हा..

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

Shivaji Satam Visits sudhir Mungantiwar parnakuti bunglow, Shivaji Satam, sudhir Mungantiwar, parnakuti bunglow

Team Lay Bhari

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

8 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

8 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

8 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

9 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

10 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

10 hours ago