राजकीय

केंद्राने ताट वाढले हे खरंय, तुमचे हात बांधलेत हेही खरंय : गोपीचंद पडळकर

टीम लय भारी

मुंबई : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विटर च्या माध्यमातून शरद पवारांवर ताशेरे ओढले आहेत. शरद पवारांचे ओबीसी समाजावर प्रेम येते कुठून असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी त्याबद्दल एक व्हिडीओ शेयर केला आहे(Gopichand padalkar tweeted a video talking about sharad pawar).

‘ज्यांनी उभ्या आयुष्यात फक्त पुतण्या, मुलगी आणि नातवाचंच भलं केलं आहे, त्या शरद पवारांचं ओबीसी प्रेम कसं उफाळून आलं? यामागे काय हेतू आहे?’ असा सवाल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना केला.

पंकजाताईंनी आपल्याच कार्यकर्त्यांना झापले, ‘मुर्खांनो’ असा केला उल्लेख

बदलीसाठी प्रांताधिकाऱ्याने महिला तलाठ्याकडे केली शरीरसुखाची मागणी

गोपीचंद पडळकर यांनी आज ट्विटर च्या माध्यमातून शरद पवारांवर ताशेरे ओढले

यावेळी त्यांनी असेही म्हंटले की, शरद पवार कोणतेही काम हेतुशिवाय करत नाहीत. त्याच बरोबर त्यांचा खरा हेतुसुद्धा ते कधी दाखवत नाहीत. पुढे ते प्रश्न करतात, केंद्राने ताट वाढले आहे हे खरे आहे, तुमचे हात बांधले आहेत हे सुद्धा खरे आहे. पण हे हात कशामुळे बांधले गेलेत?

ज्यावेळी शरद पवार सत्तेवर आले त्यावेळी त्यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवल्याचा आरोप यावेळी पडळकरांनी केला. शरद पवारांनी मागितलेल्या 2011 सालच्या जनगणनेच्या अहवालाबद्दल पडळकरांनी आपले मत व्यक्त केले.


 

‘डिजिटल मीडिया’वर सक्ती नको, उच्च न्यायालयाचा आदेश

Will pressure Centre to change OBC Bill, need caste-based census: Sharad Pawar

त्या अहवालात जो घोटाळा आहे तो मनमोहन सिंग यांच्या कालावधीत झाला असून शरद पवार सुद्धा त्यात भागीदार आहेत असे आरोप करत गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, चूक तुमची, पाप तुमचं आणि बोंब मात्र मोदी सरकार विरोधात ठोकता आहेत.

मराठ्यांसाठी कोणत्याच सुविधा करायची तयारी ठेवत नसाल तर जातनिहाय जनगणना अहवाल मागता कशाला असे प्रश्न विचारत शरद पवारांनी फक्त भूलथापा मारत बहुजनांचे लक्ष विचलित करणे चालवले आहे असे पडळकर म्हणाले.

 

Mruga Vartak

Recent Posts

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

41 mins ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

1 hour ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

2 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

18 hours ago