31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयउबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर...

उबाठा गटाच्या विलिनीकरणाबाबत मनीषा कायंदे म्हणाल्या, शरद पवारांच्या विधानानंतर…

 वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, या शरदचंद्र पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यामूळे भविष्यात उबाठा गट हा काँग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता शिवसेना सचिव डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. या विषयावर बोलताना डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, 2019 च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे व सर्वज्ञानी खासदार संजय राऊत हे शरदचंद्र पवार यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत याच न्यायाने खासदार संजय राऊत येत्या काही दिवसातच एखाद्या सकाळी भांडुपमधून उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे अशी घोषणा करतील अशी आम्हाला खात्री आहे.

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, या शरदचंद्र पवार यांनी केलेल्या व्यक्तव्यामूळे भविष्यात उबाठा गट (Ubatha group) हा काँग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता शिवसेना सचिव डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande ) यांनी व्यक्त केली आहे. या विषयावर बोलताना डॉ. मनीषा कायंदे (Manisha Kayande ) म्हणाल्या, 2019 च्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे व सर्वज्ञानी खासदार संजय राऊत हे शरदचंद्र पवार  यांचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत याच न्यायाने खासदार संजय राऊत येत्या काही दिवसातच एखाद्या सकाळी भांडुपमधून उबाठा गट (Ubatha group) काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे अशी घोषणा करतील अशी आम्हाला खात्री आहे.(Manisha Kayande on merger of Ubatha group, says after Sharad Pawar’s statement…)

देशाच्या राजकारणातील जेष्ठ नेते शरद पवार नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली व लगेचच त्यांनी सोनिया गांधीं यांचे नेतृत्व स्वीकारून सत्तेत वाटा मिळविला होता. याच शरद पवारांनी 2017 साली शिवसेनेला बाहेर ठेऊन भाजप सोबत सत्तेत जाण्याचा निर्धार केला होता व 2019 मध्ये परत शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले असून मुख्य राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रा तील छोट्या मोठ्या पक्षांची मोट बांधून पुन्हा एकदा आपणच सत्तेच्या केंद्रस्थानी आहोत असा दावा कदाचित शरदचंद्र पवार यांना करायचा असेल त्यामुळे उबाठा गटाचे ((Ubatha group)) खासदार संजय राऊत शरद पवार  यांचा आदेश मानून लवकरच पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील.

राष्ट्रवादी पक्ष ‘काँग्रेस’मध्ये विलीन होणार का? चर्चेला उधाण…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर  अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. शरद पवार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार…
शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय निवडतील, असे शरद पवार यांनी सांगितले. आमची आणि काँग्रेस विचारधारा वेगळी नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होईल, अशा चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि आम्ही समविचारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आम्ही समविचारी असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे देखील काँग्रेससारख्या समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहेत. शिवसेनेचा विचारसरणी आमच्यासारखीच आहे, मी ती जवळून पाहिली आहे. असेही शरद पवार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी