राजकीय

गोळीबार करणारे, ‘चुनचून के’ मारण्याची भाषा करणारे आता गेले कुठं?, रोहीत पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न पेटलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकच्या दौऱ्यावर येऊ नये असा इशारा दिला होता. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराजे देसाई यांचा सीमाभागाचा दौरा अचनाक रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवार यांनी ट्विट करत ”महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही” असे ट्विट करत शिंदे-फडवणीस सरकारवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पुन्हा पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगितला होता. त्यानंतर महाराष्ट्रावर कुरघोडी करत जत तालुक्यात शेतीसाठी कर्नाटकने पाणी देखील सोडले होते. बेळगावमध्ये देखील महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येऊ नये असे बोम्मई यांनी म्हटले होते. दरम्यान विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सीमावादाच्या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली. राज्य सरकार सिमावादाच्या मुद्द्यावर नरमाईची भूमिका घेत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.

दरम्यान बेळगावमधील मराठी बांधवांचे म्हणणे एकुन घेण्यासाठी महाराष्ट कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वय समिती स्थापन केली असून या समितीमध्ये चंद्रकांत पाटील, शंभुराजे देसाई हे देखील आहेत. मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी जाणार होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांचा दौरा रद्द केल्याने आमदार रोहीत पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

रोहीत पवार यांटी याबाबत ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही. सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो. दुसरीकडं महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार करणारे, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे, ‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं? असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो.’

हे सुद्धा वाचा
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारधी समाजातील उपोषणकर्त्या वृद्धाचा थंडीने कडकडून मृत्यू; गेंड्याच्या कातडीच्या बेपर्वा प्रशासनाने बळी घेतल्याचा कुटुंबाचा आरोप
एकाच वेळी 400 पदाधिकाऱ्यांनी ‘राज ठाकरें’ना केला अखेरचा जय महाराष्ट्र !
शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या घरी शिवभक्त धडकणार

सीमावादाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका हल्लाबोल सुरू केला आहे. कर्नाटकमधील आगामी निवडणूकांमुळे शिंदे-फडणवीस सरकारवर दबाब असू शकतो पण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमान गहाण टाकणे योग्य नाही असे म्हणतानाच सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या बेछूट विधानांचा देखील रोहीत पवार यांनी समाचार घेत टीका केली आहे.

 

प्रदीप माळी

Recent Posts

मनपा करसंकलन विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ

मनपा करसंकलन (Municipal Tax) विभाग जाहिरात करात दहा टक्के वाढ करणार असून आचारसंहितेनंतर हा प्रस्ताव…

10 hours ago

विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला सत्र, उच्च व सर्वोच्च अशा न्यायालयांच्या तिन्ही पातळ्यांवर…

10 hours ago

काँग्रेसचा दहशतवाद्यांना निर्दोषत्वाचे सर्टिफिकेट देण्याचा घातक खेळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबईवरील दहशतवादी हल्ला पाकिस्ताननेच घडविला हे संपूर्ण जग जाणते, खुद्द पाकिस्ताननेही याचा इन्कार केलेला नाही,…

13 hours ago

स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्रजीवन पुरस्कार जाहीर

अयोध्या येथील श्रीरामजन्म भूमी न्यासाचे खजिनदार आणि जगभरात गीतेचा प्रसार करणारे स्वामी गोविंददेवगिरी महाराज (Swami…

14 hours ago

अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येतील, नरेंद्र मोदींचा कार्यक्रम करतील

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. (Arvind Kejriwal has…

15 hours ago

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले.…

15 hours ago